ETV Bharat / sitara

बालदिन विशेष : या दोन बालकांनी मोठे होऊन गाजवला मराठीसह हिंदीचा रुपेरी पडदा

मराठमोळ्या बालकलाकारांनी अविरत काम करीत हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरा मोहरा बदलून दिला. बालदिनानिमित्त हा खास वृत्तांत.

बालदिन विशेष
author img

By

Published : Nov 13, 2019, 2:50 PM IST

मुंबई - मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. असंख्य बालकलाकार चित्रपटसृष्टीत येतात. मात्र त्यातील काही अवघ्यांनाच पुढे कारियर टिकवता येते. मात्र दोन असे मराठी बालकलाकार आहेत ज्यांनी बालकलाकार म्हणून तर कारकिर्द गाजवलीच पण मोठे होऊन त्यांनी मराठी हिंदी रुपेरी पडदाही गाजवला. इतकेच नाही तर यशस्वी दिग्दर्शक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. हे मराठमोळे कलाकार आहेत सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे.

सचिन पिळगावकर यांनी १९६२ साली हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. राजा परांजपेंच्या या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकलेला हा गुणवंत बालक आज गेली ५७ वर्षे चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजवतो आहे.

सचिन पिळगांवकर यांचा जन्म मुंबईत एका मराठी-कोकणी परिवारात झाला. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बालकलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्यांनी ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.

राजश्री प्रॉडक्शन-निर्मित गीत गाता चल या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियों के झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या.

त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर सचिन यांनी शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले. सचिन यांनी सुप्रियाच्या साथीत नच बलिये पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.

मराठी चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ असंख्या चित्रपटांचे दिग्दर्शन आणि अभिनय त्यांनी केलाय. अष्टविनायक, नवरी मिळे नवऱ्याला, गम्मत जम्मत, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी,आयत्या घरात घरोबा, माझा पती करोड पती, अदला बदली, अशी ही बनवा बनवी,नवरी मिळे नवऱ्याला, नवरा माझा नवसाचा, आम्ही सातपुते, तिचा बाप त्याचा बाप, शर्यत, एकुलती एक, कट्यार काळजात घुसली हे त्यांचे गाजलेल मराठी चित्रपट आहेत.

दुसरा मराठमोळा यशवंत बालक आहेत महेश कोठारे.त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले.

महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिलीदेखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकी पात्र वठवण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या.

कारकीर्द भरात असताना कोठार्‍यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठार्‍यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली.

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठार्‍यांनाच जाते. त्यांना २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची मन उधाण वार्‍याचे ही मालिका लोकप्रिय ठरली. त्यानंतर अलिकडे गाजलेल्या जय मल्हार या मालिकीची निर्मितीही त्यांच्या प्रॉडक्शनची आहे. त्यांचा मुलगा आदित्य कोठारे यानेदेखील माझा छकुला या चित्रपटातून बालकलाकार म्हणून कारकिर्दीस सुरूवात केली आहे. आज आदत्य मराठी चित्रपटाचा आघाडीचा नायक म्हणून ओळखला जातो.

बालदिनाच्या निमित्ताने सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांच्या या अपार कर्तृत्वाला ई टीव्ही भारता सलाम. त्यांच्या हातून चित्रपटसृष्टीचे सेवा होत राहो या शुभेच्छा.

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.