वॉशिंग्टन : मार्वलच्या अनेक सिनेमांमध्ये ब्लॅक पँथर या सुपरहीरोची भूमीका साकारणारा अभिनेता चॅडविक बोसमन याचे 28 ऑगस्टला निधन झाले होते. त्याच्यावर तीन सप्टेंबरला साऊथ कॅरोलिनाच्या बेल्टनमधील एका चर्चमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर चर्चच्या दफनभूमीमध्ये त्याला दफन करण्यात आले. सोमवारी याबाबत माहिती जाहीर करण्यात आली.
चॅडविक हा गेल्या चार वर्षांपासून कोलोन कॅन्सरशी अर्थात आतड्याच्या कर्करोगाशी लढा देत होता आणि अखेर त्याची ही लढाई अपयशी ठरली. 28 ऑगस्टला लॉस एंजलिसमधील राहत्या घरी त्याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्याच्या या आजाराबाबत त्याच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त अत्यंत कमी लोकांना माहिती होती. मार्शल चित्रपटापासून ते डीए ५ ब्लड्सपर्यंत, असे असंख्य चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते. या काळात त्याच्यावर शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरू होती. त्याने 'ब्लॅक पँथर' चित्रपटात आणि एव्हेंजर्स चित्रपट मालिकेमध्ये मध्ये साकारलेली किंग टी-चाला ही व्यक्तीरेखा त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात सन्मानजनक ठरली.
हेही वाचा : लॉकडाऊनमध्ये बनवली 'पायरेट्स ऑफ कॅरेबियन' या हॉलिवूडपटातील 'ब्लॅक पर्ल' या जहाजाची प्रतिकृती