थिरुअनंतपुरम: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात या वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचो आंदोलन झाले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या मल्याळम 'वर्तमानम' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या (सीबीएफसी) प्रादेशिक कार्यालयाने प्रदर्शनासाठी परवानगी नाकारली आहे.
प्रख्यात चित्रपट निर्माते सिद्धार्थ शिव दिग्दर्शित या चित्रपटात पुरस्कार विजेती अभिनेत्री पार्वती तिरुवोथ मुख्य भूमिकेत आहे. केरळमधून रिसर्चसाठी जेएनयूमध्ये गेलेल्या एका महिलेल्या भोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे.
चित्रपटाचे निर्माता-पटकथा-लेखक आर्यदान शौकथ म्हणाले की, ''येथील सीबीएफसी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र नाकारण्याचे कोणतेही कारण सांगितले नाही. ते म्हणाले की हा चित्रपट या आठवड्यातच मुंबईतील सेन्सॉर बोर्डाच्या सुधारित समितीकडे सादर केला जाईल.''
“येथील सीबीएफसी अधिका-यांनी आम्हाला हा चित्रपट सुधार समितीला सादर करावा लागतो असे सांगितले आहे. या चित्रपटाचे प्रमाणपत्र का नाकारले गेले हे अद्याप आम्हाला ठाऊक नाही,'' असे शौकनाथ यांनी सांगितले आहे. शौकथ हे कॉंग्रेसचे नेतेही आहेत.
स्क्रिप्ट लिहिण्यापूर्वी त्यांनी कित्येक महिने संशोधन व अभ्यास केला होता. जेएनयू कॅम्पसमधील संस्कृती आणि जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी दिल्लीत बरेच दिवस घालवले होते, असे या पुरस्कारप्राप्त स्क्रिप्ट लेखकांनी सांगितले.
ते म्हणाले, “३१ डिसेंबरपूर्वी सेन्सॉर बोर्डाची मंजुरी न मिळाल्यास आम्ही या वेळी कोणत्याही पुरस्कारासाठी हा चित्रपट पाठवू शकत नाही.” असे शौकथ यांनी म्हटलंय. राजकीय कारणामुळे हा नकार दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -शाहिद आणि विजय सेतुपती करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण