मुंबई - बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर गौरी खानने अलीकडेच आपल्या स्टूडिओमध्ये एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. ही पार्टी करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन एंटरटेनमेंटच्या शोसाठी आयोजित करण्यात आली होता. या पार्टीत बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.
- View this post on Instagram
Tips on how to ace a reality Tv show .....woooooo can’t wait to watch this one 😍
">
यावेळी शाहरुख खानने ट्रेडमार्क काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर, गौरी लाल रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. दोघांचीही खास केमेस्ट्री दिसून येत होती. या जोडीचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा -परीक्षेच्या अगोदर अक्षयने लेकीला दिल्या कराटे टिप्स
गौरी खानने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पार्टीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिची मैत्रीण भावना पांडेय, महीप कपूर, समी खान आणि नीलम कोठारी यांची झलक पाहायला मिळते.
याशिवाय, अभिनेत्री अनन्या पांडेचाही ग्लॅमरस लुक पार्टीत पाहायला मिळाला. त्यावर तिच्या स्टायलिश ड्रेसमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते.
अनन्यासोबतच, सिद्धार्थ मल्होत्रा, शनाया कपूर, नेहा धूपिया, अंगद बेदी, सोहेल खान आणि इतर कलाकारांनीही या पार्टीला अधिक शानदार बनवले.
हेही वाचा -'सूर्यवंशी'च्या सेटवर कॅटरिनाने केली साफसफाई, अक्षयने शेअर केला मजेदार व्हिडिओ