चेन्नई - भाजपाच्या तामिळनाडू युनिटने अभिनेत्री ओवीयाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. ओव्या हिने पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेब्रुवारी रोजी चेन्नईच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक विकास प्रकल्प सुरू केले. पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी दक्षिण भारतीय अभिनेत्री ओवीयाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर #GoBackModi असे ट्वीट केले. ओवियाचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचीही अफवा आहे.
भाजपाच्या तमिळनाडू युनिटने अभिनेत्री ओवीया हेलन हिच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
ओवीयाविरोधात कारवाई करण्याचे आवाहन तामिळनाडूचे भाजपचे प्रदेश सचिव डी एलेक्सिस सुधाकर यांनी चेन्नई येथील पोलोस अधीक्षक सीबी-सीआयडीकडे केले आहे.
हेही वाचा - ‘लूप लपेटा’च्या सेटवर तापसी पन्नूची अनोखी ‘आत्मनिर्भरता’!