ETV Bharat / sitara

रुपेरी पडद्यावर उलगडणार 'द अनटोल्ड वाजपेयी'

अमाश फिल्म्सचे मालक असलेले शिवा शर्मा आणि जीशान अहमद यांनी 'द अनटोल्ड वाजपेयी'चे हक्क खरेदी केली आहेत. आता त्यांच्या आयुष्यातील काही घडामोडी बायोपिकच्या रुपात सादर करण्यात आल्या आहेत.

रुपेरी पडद्यावर उलगडणार 'द अनटोल्ड वाजपेयी'
author img

By

Published : Aug 27, 2019, 9:11 PM IST

मुंबई - राजकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्ण पान म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. १६ ऑगस्ट २०१८ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं. मात्र, त्यांचा जीवनकाळ आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यांचे 'द अनटोल्ड वाजपेयी' या आत्मचरित्रावर आधारित बायोपिक लवकरच तयार करण्यात येणार आहे.

अमाश फिल्म्सचे मालक असलेले शिवा शर्मा आणि जीशान अहमद यांनी 'द अनटोल्ड वाजपेयी'चे हक्क खरेदी केली आहेत. आता त्यांच्या आयुष्यातील काही घडामोडी बायोपिकच्या रुपात सादर करण्यात आहे.

शिवा शर्मा यांनी याबाबत सांगितले की 'द अनटोल्ड वाजपेयी माझ्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. अटलजींचा कार्यकाळ पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न या बायोपिकद्वारे करणार आहे. खूप जणांना त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत. त्यांचे आत्मचरित्र वाचताना मला देखील त्यांच्याबद्दल बरंच काही जाणून घेता आलं. याच गोष्टी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा आमचा मानस आहे'.

अहमद यांनी सांगितले, की 'चित्रपटाच्या कथानकावर आता काम सुरू आहे. स्क्रिप्टिंग पूर्ण झाले की आम्ही या चित्रपटातील कलाकारांची नावे जाहीर करू. सध्या तरी या बायोपिकचे नाव 'द अनटोल्ड वाजपेयी' असेच राहणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.