ETV Bharat / sitara

माधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे” - Big Boss contestant

बॉस मराठीचा स्पर्धक माधव देवचके सध्या बराच चर्चेत आहे. तो स्वावलंबी असल्याचे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे. आपली ओळख माधवच्या लहानपणापासूनच ‘माधवचे वडिल’ अशी होती असेही ते म्हणाले.

माधव देवचके
author img

By

Published : Jun 17, 2019, 4:47 PM IST

बिग बॉस मराठीच्या घरात असलेल्या अभिनेता माधव देवचकेची त्याच्या चाहत्यांमध्ये इमेज ‘समंजस’ बिग बॉस कन्टेस्टंट अशी आहे. त्याच्या वडिलांनीही फादर्स डे निमित्ताने त्याची पाठ थोपटलीय.“फादर्स डे’ निमित्ताने संवाद साधताना माधवचे वडिल चारूदत्त देवचके म्हणाले, “लहानपणापासूनच माधवमध्ये समंजसपणा आम्हांला दिसून आलाय. ब-याचदा मुलांची ओळख त्यांच्या वडिलांमूळे असते. पण माझी ओळख माधवच्या लहानपणापासूनच ‘माधवचे वडिल’ अशी होती.”

Big Boss contestant
माधव देवचके

“मी नाट्यनिर्माता असल्यामूळे माझ्या ओळखीचा फायदा माधवला करीयरमध्ये कधी ना कधी व्हावा, अशी माझी इच्छा होती. पण माधवने कुठेही माझी ओळख न वापरता स्वत:च्या ताकदीवर आपलं करीयर घडवलं, याचा मला अभिमान आहे. अभिनेत्याच्या करीयरमध्ये ब-याचदा आर्थिक उतार-चढाव होत असतात, पण अशावेळेसही मी देऊ केलेली मदत स्वावलंबी माधवने स्विकारली नाही.”

‘बिग बॉस’ मधल्या माधवच्या वाटचाली विषयी त्याचे वडिल सांगतात, “बिग बॉसमध्ये माधव खूप चांगलं खेळतोय. कुठेही पातळी न घसरू देता, आणि आपले संस्कार न विसरता तो खेळतोय, याचा मला अभिमान आहे. राग व्यक्त करतानाही तो खूप संयतपणे व्यक्त करतोय. बिग बॉस जिंकून येण्यासाठी माधवला माझ्या शुभेच्छा.”

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.