ETV Bharat / sitara

चाहत्याने प्रपोज केल्यानंतर भूमीच्या प्रतिक्रियेने जिंकलं मन - Bhumi pednekar in news

एका चाहत्याने सोशल मीडियावर भूमीप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Bhumi pednekar
चाहत्याने प्रपोज केल्यानंतर भूमीच्या प्रतिक्रियेने जिंकलं मन
author img

By

Published : Nov 29, 2019, 12:29 PM IST

मुंबई - सिनेसृष्टीतील कलाकराची चाहत्यांमध्ये नेहमीच क्रेझ पाहायला मिळते. आपल्या लाडक्या कलाकारांना भेटण्याची, त्यांची एक झलक मिळवण्यासाठी किंवा त्यांची एक प्रतिक्रिया मिळवण्यासाठी हे चाहते नेहमी प्रयत्नात असतात. असाच एका चाहत्याचा प्रयत्न फळास आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आपल्या चाहत्याला दिलेल्या एका प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळतेय.

भूमीचा 'पती, पत्नी और वो' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. आजवर तिने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या फॅन फोलोविंगची संख्याही मोठी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स पाहायला मिळतात.

हेही वाचा -सलमानच्या नवीन गाण्यावरून वाद; ट्विटरवर ट्रेंड होतोय 'बॉयकॉट दबंग ३' हॅशटॅग

तिच्या अशाच एका चाहत्याने सोशल मीडियावर भूमीप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'मी तुझा फोटो पाहिला नाही, असा एकही दिवस आत्तापर्यंत गेला नाही. तू खूपच सुंदर आहेस. तू एखादी सर्वसामान्य मुलगी असावी, अशी माझी इच्छा होती. आता तू एक मोठी स्टार आहेस. कितीही प्रेम केले, तरी तू एखाद्या सेलिब्रिटी नसणाऱ्या व्यक्तीशी लग्न करणार नाहीस. याचंच दु:ख आहे'.

Bhumi pednekar hilarious response to fan's marriage proposal is unmissable
चाहत्याने प्रपोज केल्यानंतर भूमीच्या प्रतिक्रियेने जिंकलं मन

हेही वाचा -'घोस्ट स्टोरीज'साठी एकत्र आले आघाडीचे दिग्दर्शक, नव्या वर्षापासून होणार सुरुवात

आपल्या चाहत्याच्या या पोस्टची दखल घेत भूमीनेही प्रतिक्रिया दिली आहे. 'सेलिब्रिटी असो किंवा नसो, सध्या लग्नाचे चान्सेस कमी आहेत. पण, काळजी करू नको, तुला माझी जास्त आठवण येऊ देणार नाही. जसं शक्य होईल तसं पडद्यावर नेहमी दिसण्याचा प्रयत्न करेल', असं भूमीने आपल्या कमेंटमध्ये लिहून चाहत्याला रिप्लाय दिला आहे.

भूमीचा हा प्रेमळ रिप्लाय पाहून चाहत्यांनाही आनंद झाला आहे. तिच्या या प्रेमळवृत्तीचं कौतुक करून सोशल मीडियावर तिच्या या कमेंटवर आणखी प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा -'पती, पत्नी और वो': पाहा कार्तिक - अनन्याची खास मुलाखत

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.