ETV Bharat / sitara

#बालदिन विशेष : जगभरातील बच्चे कंपनीला भुरळ पाडणारे हॉलिवूड सिनेमे

author img

By

Published : Nov 14, 2019, 12:04 PM IST

आज बालदिन साजरा होत असताना मुलांच्या प्रभाव टाकणाऱ्या आणि पालकांनाही भुरळ पाडणाऱ्या हॉलिवूड चित्रपटांचा विचार डोक्यात आल्या शिवाय राहात नाही. यात छोट्या कलाकारांनी केलेला अभिनय जस भावला तसाच त्यातील निरागस आशयही सुखावून गेला.

#बालदिन विशेष

गेली काही दशके मुलांचे मनोरंजन करणाऱ्या फिल्मस् हॉलिवूडमध्ये बनत आल्या आहेत. जगभरातील बच्चे कंपनीला त्यांनी वेडावून सोडलंय. अशाच काही चित्रपटांचा आढावा आपण इथे घेणार आहोत.
बेबीज डे आऊट

movies bout kids and their life
मुलांचे भावविश्व उलगडणारे हॉलिवूड चित्रपट
रांगणाऱ्या मुलाने केलेली कमाल जेव्हा आपल्याला आठवत असेल तेव्हा बेबीज डे आऊटची आठवण आल्या शिवाय राहात नाही. अबालवृध्दांना या सिनेमाने वेड लावले होते.
होम अलोन

घरात एकट्याने राहणाऱ्या व्रात्य मुलाची ही गोष्ट जगभरातील प्रेक्षकांना आवडली. बंद घर पाहून चोरी करण्यासाठी घुसणाऱ्या सराईत चोरांना घरात एकटा असलेला हा मुलगा कशी पळता भुई थोडी करतो याचे मजेशीर चित्रण यात पाहायला मिळाले होते.

हनी, आय श्रंक द किड्स

हा एक सायन्स फिक्शन कॉमेडी चित्रपट होता. एका अचानक घडलेल्या घटनेत एक मुलगा पाव इंचाचा होतो आणि मग त्याला कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागते याचा मजेशीर अनुभव या सिनेमाने दिला.

लिटल रास्कल्स

शेजारी राहणाऱ्या मुलांच्या टोळीची ही गोष्ट होती. एक शर्यत जिंकण्यासाठी त्यांच्यातील निरागसपणा आणि घट्ट मैत्री यांच्या जोरावर ते कसे एकसंध होतात हे सिनेमात फारच सुंदररित्या दाखवण्यात आले होते.

जुमान्जी

हा एक फँटसी चित्रपट होता. अॅडव्हेन्चरस गेम जेव्हा खऱ्या आयुष्यात वेगळ्या पध्दतीने येते तेव्हा काय घडू शकेल याचा थरार या सिनेमात पाहायला मिळाला होता.

स्पाय किड्स

हा एक अमेरिकन साय फाय कौटुंबिक चित्रपट होता. ही दोन मुलांची गोष्ट होती. एका माजी गुप्तहेरांच्या मुलांना आपले पालक काय करीत होते याची कल्पना नसते. पालकांना ओलीस ठेवल्यानंतर ही मुले त्यांची कशी चतुराईने सुटका करतात याचे सुंदर चित्रण या सिनेमात पाहायला मिळाले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.