मुंबई - अभिनेता भाऊसाहेब शिंदे याचा मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला 'बबन' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री गायत्री जाधव हीदेखील झळकली होती. या चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. तसेच, भाऊसाहेब आणि गायत्रीच्या जोडीलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव आणि अर्चना जॉईस यांची भूमिका असलेला 'राजकुमार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नव्या रुपात, नव्या ढंगात 'बबन'ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांनाही या चित्रपटाची उत्सुकता आहे.
या चित्रपटात 'मुळशी पॅटर्न' आणि 'नाळ' चित्रपटांमधील कलाकार अर्चना जॉईस, प्रवीण विठ्ठल तरडे, देविका दफ्तरदार, श्रीनिवास पोकळे, हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समर्थ राज इडिगा यांनी केले आहे. समर्थ यांनी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.