ETV Bharat / sitara

संजय दत्तच्या 'बाबा'मधून ‘तनू वेडस मनू’मधील 'हा' अभिनेता करणार मराठीत पदार्पण - tanu weds manu

'बाबा' या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता या चित्रपटाच्या स्टारकास्टविषयीची माहितीही समोर आली आहे.

बाबा चित्रपटाची स्टारकास्ट
author img

By

Published : Jun 20, 2019, 1:29 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लवकरच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'बाबा' या मराठी सिनेमाची तो निर्मिती करणार आहे. नुकतंच चित्रपटाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं होतं. ज्यात प्रेक्षकांना वडील आणि मुलाची झलक पाहायला मिळाली.

आता या चित्रपटाच्या स्टारकास्टविषयीची माहितीही समोर आली आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि ‘तनू वेडस मनू’मध्ये भूमिका बजावलेला दीपक दोब्रियाल हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल. हा त्याचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. नंदिता धुरी पाटकरसुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि लोकप्रिय बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. यापूर्वी माधुरी दिक्षितच्या ‘बकेट लिस्ट’या सिनेमाच त्यांनी सह-दिग्दर्शन केलं होते. तसेच ‘धागा’ या मराठी लघुपटाचे दिग्दर्शनही केलं होतं. चित्रपटाबद्दल राज गुप्ता म्हणाले, भावनांना भाषा नसते. ही गोष्ट आमच्या चित्रपटातील कलाकारांनी अगदी योग्यपणे अधोरेखित केली आहे. सर्व अडचणीवर मात करून एक कुटुंब एकत्र राहण्याचा कसा प्रयत्न करतं, याची ही ‘कडू-गोड’ प्रसंगांनी भरलेली कथा आहे. सिनेमाची कथा कोकणात घडत असून वडील मुलाच्या नात्यावर आधारित अशी अतिशय हृदयस्पर्शी कथा या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न या टीमनं केला आहे.

Intro:हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेला लोकप्रिय व रसिकांचे भरभरून प्रेम मिळालेला सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ते ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’खाली त्यांनी अशोक सुभेदार व आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’बरोबर त्यांनी चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ने याआधी ‘बकेट लिस्ट’ या माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका असलेल्या तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती.

‘बाबा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय. हा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि ‘तनु वेडस मनु’मध्ये प्रमुख भूमिका बजाविलेला दीपक दोब्रियाल हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल. हा त्याचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. नंदिता धुरी पाटकरसुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि लोकप्रिय बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. यापूर्वी माधुरी दिक्षितच्या ‘बकेट लिस्ट’या सिनेमाच त्यांनी सह-दिग्दर्शन केलं होते. आणि झी 5 साठी ‘धागा’ या मराठी लघुपटाचे दिग्दर्शन केले होते.

संजय दत्त यांनी ट्विट करून आपले वडील आणि महान कलाकार सुनील दत्त यांना हा चित्रपट समर्पित केला आहे. "आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' जी माझ्या मागे प्रत्येक बाबतीत खंबीरपणे उभी राहिली अशा व्यक्तीस समर्पित करत आहोत. लव्ह यू डॅड!," संजय म्हणतो.

मान्यता दत्तने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' आम्ही सुनील दत्त साहेबांना समर्पित करत आहोत. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आमचा आत्मविश्वास नेहमीच द्विगुणित होत गेला."

बाबा’चे दिग्दर्शक राज आर गुप्ता म्हणाले, “भावनांना भाषा नसते. ही गोष्ट आमच्या चित्रपटातील कलाकारांनी अगदी योग्यपणे अधोरेखित केली आहे. सर्व अडचणीवर मात करून एक कुटुंब एकत्र राहण्याचा कसा प्रयत्न करते, याची ही ‘कडू-गोड’ प्रसंगांनी भरलेली कथा आहे.”

सिनेमाची कथा कोकणात घडत असून वडील मुलाच्या नात्यावर आधारित अशी अतिशय हृदयस्पर्शी कथा या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न या टीमने केला आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.