मुंबई - प्रसिध्द बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाला 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलंय.
आयुष्यमान म्हणाला, ''तुम्ही जेव्हा एखाद्या निषिध्द विषयावर चित्रपट बनवता तेव्हा तो विषय अधिक लोकापर्यंत कसा पोहोचेल याची योजनाही बनवली जाते. मग आम्ही समलैंगिकतेचा विषय निवडला आणि हा विषय विनोदी ढंगाने सादर केला. आमच्या या निर्णयामुळे 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट यशस्वी ठरलाय.''
हा चित्रपट बनवणे अवघड काम होते असे तो म्हणाला.
आयुष्यमानने पुढे सांगितले, ''हा विषय लोकापर्यंत पोहोचवणे कठिण काम आहे, हे आम्ही अगोदरच जाणत होतो. म्हणून मनोरंजनाच्या माध्यामातून हा विषय पोहोचवण्याचा निर्णय केला. महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला याचा मला आनंद होतोय. हा संदेश लोकापर्यंत पोहोचत असून घरामध्ये यावर चर्चा सुरू झाली आहे.''
'' 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून खूश आहे. कारण भारतीय प्रेक्षकांसाठी वर्जित विषयांपैकी हा एक आहे. याचे यश सांगतंय की भारत प्रगतशील होत आहे आणि कुटुंबातील लोक थिएटरला जाऊन हा सिनेमा पाहात आहेत.''
आयुष्यमानला वाटते की 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या सारख्या विषयावरील अजून चित्रपट बनावेत आणि निर्माते यासाठी पुढाकार घेतील अशी आशाही त्याला वाटते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">