ETV Bharat / sitara

समलैंगिक भूमिकेविषयी आयुष्मानच्या मुलाची प्रतिक्रिया, ताहिराने केलं ट्विट

आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यपने आपल्या मुलाची प्रतिक्रिया ट्विटवरुन पोस्ट केली आहे. त्यांचा मुलगा विराजवीरशी संवाद साधत असताना ताहिराने त्याला आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटातील भूमिकेविषयी प्रश्न विचारला.

Ayushmaan's son Virajveer's Reaction on His role in SMZS, read Tahira's Twit
समलैंगिक भूमिकेविषयी आयुष्मानच्या मुलाची प्रतिक्रिया, ताहिराने केलं ट्विट
author img

By

Published : Jan 28, 2020, 10:51 AM IST

मुंबई - आयुष्मान खुराना 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट घेऊन नव्या वर्षात धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट समलैंगिकता या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्मान पहिल्यांदा समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या या भूमिकेविषयी त्याच्या कुटुंबीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर, त्याची पत्नी ताहिरा हिनेही आयुष्मानचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आयुष्मानच्या अवघ्या ८ वर्षाच्या मुलाने दिलेल्या प्रतिक्रियेची नेटकऱ्यांनी प्रशंसा केली आहे.

आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यपने आपल्या मुलाची प्रतिक्रिया ट्विटवरुन पोस्ट केली आहे. त्यांचा मुलगा विराजवीरशी संवाद साधत असताना ताहिराने त्याला आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटातील भूमिकेविषयी प्रश्न विचारला. समलैंगिकता किंवा 'गे' म्हणजे काय असा प्रश्न तिने त्याला विचारला. तर, याविषयी त्याला चांगली माहिती होती. तसेच, तो आयुष्मानच्या भूमिकेविषयी देखील सकारात्मक आहे. या गोष्टीत योग्य न वाटण्यासारखं काहीच नाही, अशी प्रतिक्रिया विजयवीरने दिली असल्याचं ताहिराने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

  • With the upcoming film the dad is doing, I wanted to be forthcoming with my 8 year old son. I asked him if he knows what homosexuality means or being gay means. He knew it. I asked him if he was ok with it. He replied...what’s there not be ok about. (Teary eyed and proud)

    — Tahira Kashyap Khurrana (@tahira_k) January 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -'शुभ मंगल जादा सावधान'चे पहिले गाणे रिलीज, आयुष्यमान बनला 'गबरु'!!

अलिकडेच ताहिराने देखील आयुष्मानच्या या भूमिकेविषयी प्रतिक्रिया दिली होती. 'मला आयुष्मानबद्दल फार अभिमान वाटतो. तो ज्याप्रकारचे चित्रपट साकारतो त्यामधून काही ना काही संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. हा चित्रपटही तसाच आहे. मला असं वाटतं, की प्रेम ही भावना साजरी करायला हवी. ज्यावेळी एखाद्या मुलाची मुलाबरोबर किंवा मुलीची मुलीबरोबर प्रेम असणाऱ्या कथांना स्वीकारले जाईल, तेव्हा देशाचा विकास होतोय, असे मला वाटेल. अशा चित्रपटात आयुष्मान भूमिका साकारतोय, याचा मला आनंद आहे, असे तिने म्हटले होते.

'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात नीना गुप्ता आणि गजराज राव यांची देखील मुख्य भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -आयुष्मान खुरानाची पुन्हा धमाल, पाहा 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चा ट्रेलर

Intro:Body:

समलैंगिक भूमिकेविषयी आयुष्मानच्या मुलाची प्रतिक्रिया, ताहिराने केलं ट्विट

मुंबई - आयुष्मान खुराना 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट घेऊन नव्या वर्षात धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट समलैंगिकता या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्मान पहिल्यांदा समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या या भूमिकेविषयी त्याच्या कुटुंबीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर, त्याची पत्नी ताहिरा हिनेही आयुष्मानचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आयुष्मानचा अवघ्या ८ वर्षाच्या मुलाने दिलेल्या प्रतिक्रियेची नेटकऱ्यांनी प्रशंसा केली आहे.

आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यपने आपल्या मुलाची प्रतिक्रिया ट्विटवरुन पोस्ट केली आहे. त्यांचा मुलगा विराजवीरशी संवाद साधत असताना ताहिराने त्याला आयुष्मानच्या  'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटातील भूमिकेविषयी प्रश्न विचारला. समलैंगिकता किंवा 'गे' म्हणजे काय असा प्रश्न तिने त्याला विचारला. तर, याविषयी त्याला चांगली माहिती होती. तसेच, तो आयुष्मानच्या भूमिकेविषयी देखील सकारात्मक आहे. या गोष्टीत योग्य न वाटण्यासारखं काहीच नाही, अशी प्रतिक्रिया विजयवीरने दिली असल्याचं ताहिराने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

अलिकडेच ताहिराने देखील आयुष्मानच्या या भूमिकेविषयी प्रतिक्रिया दिली होती. 'मला आयुष्मानबद्दल फार अभिमान वाटतो. तो ज्याप्रकारचे चित्रपट साकारतो त्यामधून काही ना काही संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. हा चित्रपटही तसाच आहे. मला असं वाटतं, की प्रेम ही भावना साजरी करायला हवी. ज्यावेळी एखाद्या मुलाची मुलाबरोबर किंवा मुलीची मुलीबरोबर प्रेम असणाऱ्या कथांना स्वीकारले जाईल, तेव्हा देशाचा विकास होतोय, असे मला वाटेल. अशा चित्रपटात आयुष्मान भूमिका साकारतोय, याचा मला आनंद आहे, असे तिने म्हटले होते.

'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात नीना गुप्ता आणि गजराज राव यांची देखील मुख्य भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.