ETV Bharat / sitara

'अॅव्हेंजर्स एन्डगेम'ने भारतात २ दिवसात पार केला १०० कोटींचा गल्ला - box office

चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली असून केवळ २ दिवसांतच १०० कोटींचा गल्ला पार केला आहे.

'अॅव्हेंजर्स एन्डगेम'ची धमाकेदार कमाई
author img

By

Published : Apr 28, 2019, 2:14 PM IST

मुंबई - मार्व्हल चाहत्यांची उत्सुकता शिगेला नेणारा 'अॅव्हेंजर्स एन्डगेम' चित्रपट नुकताच चित्रपटगृहात दाखल झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच अनेक विक्रम मोडणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही आपली छाप उमटवली आहे. या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी ५३.१० कोटींचा कमाई केली होती.

यापाठोपाठ आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडेदेखील समोर आले आहेत. चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली असून केवळ २ दिवसांतच १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ५१.४० कोटींची कमाई केली आहे.

केवळ २ दिवसात चित्रपटाने १०४.५० कोटी इतका गल्ला जमवला आहे. 'अॅव्हेंजर्स एन्डगेम' या सिनेमात रॉबर्ट डाउनी जूनियर, क्रिस इवांस, मार्क रफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट जोहानसन, जेरेमी रेनर, पॉल रड आणि ब्री लार्सन यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:

ENT NEWS

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.