ETV Bharat / sitara

इरफानसाठी लिहिला होता 'रोड टू लद्दाख', फुकट केले होते काम

author img

By

Published : May 8, 2020, 1:35 PM IST

२००४ मध्ये 'रोड टू लद्दाख' ही शॉर्टफिल्म अश्विन कुमार यांनी बनवली होती. यात इरफान खानची महत्त्वाची भूमिका होती. या फिल्मसाठी इरफानने पैसे घेतले नव्हते. त्याच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिलाय राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी.

ROAD-TO-LADAKH-
'रोड टू लद्दाख'

मुंबई - ऑस्करसाठी नामांकन मिळालेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी २००४ मध्ये 'रोड टू लद्दाख' ही ४८ मिनीटांची शॉर्ट फिल्म बनवली होती. यात त्यांनी इरफान खानसोबत कामाचा अनुभव घेतला होता. अश्विन यांचे म्हणणे आहे की, इरफानसोबत काम करताना आपल्या व्यवसायाबद्दल असलेला दृष्टीकोनच बदलून गेला होता.

इरफान यांचे २९ एप्रिलला निधन झाले. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना अश्विन यांनी सांगितले की, ''इरफान यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. शॉर्ट फिल्मला सहकार्य करण्याची विनंती त्यांनी इरफानला केली होती. ''

याबद्दल बोलताना अश्विन यांनी सांगितले, ''मी इरफानला डोळ्यासमोर ठेवून 'रोड टू लद्दाख' लिहिले होते. मला त्याच्या सहकार्याची आवश्यकता होती. मला आठवतं, आम्ही जेव्हा लदाखला जाण्यासाठी दिल्लीत होतो त्या संध्याकाळी एका अपघातात इरफान याला जखम झाली. त्याच्या हाताला जखम झाली. यामुळे शूटिंगला नकार देण्यासाठी त्याच्याकडे वैद्यकिय कारण होते. परंतु तो म्हणाला, मी तुला वचन दिलंय, ते निभावणार. मी त्याला जेवढे ओळखायला लागलो तसे त्याच्याबद्दलचा आदर वाढत गेला.''

अश्विन यांनी पुढे सांगितले, ''त्यावेळी त्याला माहिती नव्हते की त्याला उंचीचा प्रॉब्लेम आहे. लदाखला पोहोचल्यानंतर आम्हाला याबद्दल कळले. तो आजारी होता. त्याच्या हाताला जखम होती. मोसम खराब असताना आम्ही टेन्टमध्ये राहात होतो. परंतु त्याने हार मानली नाही आणि निरंतर आम्हाला सहकार्य केले.''

इरफान खान यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री अजूनही धक्क्यात आहे. त्याच्यासोबत काम केलेल्यांकडून त्याचा साधेपणा, सहकार्य करण्याची वृत्ती याबाबतचे अनेक किस्से लोक सांगताना दिसत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.