ETV Bharat / sitara

शाहरुखच्या लेकासोबत दिसणारी कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल', सोशल मीडियावर चर्चेला उधाण - gouri khan

आर्यनचा एका मुलीसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आर्यनची बहीण सुहानाच्या फॅनपेजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे या फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी नेमकी कोण आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

शाहरुखच्या लेकासोबत दिसणारी कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल', सोशल मीडियावर चर्चेला उधाण
author img

By

Published : Jul 25, 2019, 6:48 PM IST

मुंबई - सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्टारकिडची चर्चा पाहायला मिळते. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही आतुर असतात. सध्या किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा चर्चेत आला आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'द लॉयन किंग' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये त्याने 'सिंबा'च्या पात्राला आवाज दिला आहे. मात्र, आणखी एका कारणामुळे तो सध्या चर्चेत आला आहे.

आर्यनचा एका मुलीसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आर्यनची बहीण सुहानाच्या फॅनपेजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे या फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी नेमकी कोण आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Aryan Khan
आर्यन खान

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन सध्या लंडन येथे राहणाऱ्या एका ब्लॉगरला डेट करत आहे. मात्र, फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी त्याची गर्लफ्रेन्ड आहे की नाही, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

शाहरुखप्रमाणे आता आर्यनच्या लोकप्रियतेतही भर पडत आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याचे बरेच फोटो शेअर करत असतो. त्याने 'सिंबा' या पात्राला आवाज दिल्यामुळे त्याचे कलाविश्वातून कौतुकही होत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.