ETV Bharat / sitara

सलमान खानचा भाचीसोबतचा पहिला फोटो - salman khan upcoming film

सलमान खानची बहीण अर्पिता खान - शर्मा सलमान खानच्या वाढदिवशी दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिने सलमानचा तिच्या मुलीसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे.

Arpita Khan sharma share Photo of Salman khan with Ayat
सलमान खानचा भाचीसोबतचा पहिला फोटो
author img

By

Published : Jan 14, 2020, 7:00 PM IST

मुंबई - अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान - शर्माने काही दिवसांपूर्वी एका गोंडस परीला जन्म दिला आहे. तिने तिच्या मुलीचे नाव आयत असे ठेवले आहे. सलमान खानच्या वाढदिवशीच आयतचा जन्म झाला. त्यामुळे सलमान खानसाठी त्याचा यंदाचा वाढदिवस विशेष ठरला. अर्पिताने सलमान खानच्या हातात असलेल्या आयतचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अर्पिता आणि आयुष शर्मा यांना आहिल नावाचा पहिला मुलगा आहे. सलमान खानच्या वाढदिवशी म्हणजे २७ डिसेंबरला अर्पिता दुसऱ्यांदा आई बनली.
अर्पिताने सलमान खानचा हा फोटो शेअर करून एक खास पोस्टही लिहिली आहे. सलमान खानसोबतच त्याची आई सलमा खान देखील या फोटोमध्ये पाहायला मिळतात. 'या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही, ज्याची मला भीती वाटेल. कारण, माझ्या पाठीशी तू आहेस. तू माझ्यासोबत काहीही वाईट होऊ देत नाही. आता आयतच्या डोक्यावरही तुझा आशिर्वाद आहे. ती देखील माझ्याप्रमाणेच तुझ्या सावलीत सुरक्षित आहे', असे अर्पिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा -'दिल ने कहा': पाहा कंगनाच्या 'पंगा'चं रोमॅन्टिक गाणं

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सलमान खानच्या 'दबंग ३' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता तो 'राधे' चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. तसेच, अलिकडेच त्याने 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाचीही घोषणा केली आहे.

हेही वाचा -अमिताभ बच्चनपासून ते हृतिकपर्यंत सर्वांनाच 'या' डान्सरने लावले वेड, पाहा व्हिडिओ

Intro:Body:

Arpita Khan share Photo of Salman khan with Ayat

Salman khan with his niece ayat, adorable pic of Salman carrying niece Ayat, salman khan and salma khan, salman khan news, salman khan upcoming film, salman khan with ayat

सलमान खानचा भाचीसोबतचा पहिला फोटो

मुंबई - अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानने काही दिवसांपूर्वी एका गोंडस परीला जन्म दिला आहे. तिने तिच्या मुलीचे नाव आयत असे ठेवले आहे. सलमान खानच्या वाढदिवशीच आयतचा जन्म झाला. त्यामुळे सलमान खानसाठी त्याचा यंदाचा वाढदिवस विशेष ठरला. अर्पिताने सलमान खानच्या हातात असलेल्या आयतचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

अर्पिता आणि आयुष शर्मा यांना आहिल नावाचा पहिला मुलगा आहे. सलमान खानच्या वाढदिवशी म्हणजे २७ डिसेंबरला अर्पिता दुसऱ्यांदा आई बनली. 

अर्पिताने सलमान खानचा हा फोटो शेअर करून एक खास पोस्टही लिहिली आहे. सलमान खानसोबतच त्याची आई सलमा खान देखील या फोटोमध्ये पाहायला मिळतात. 'या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही, ज्याची मला भीती वाटेल. कारण, माझ्या पाठीशी तू आहेस. तू माझ्यासोबत काहीही वाईट होऊ देत नाही. आता आयतच्या डोक्यावरही तुझा आशिर्वाद आहे. ती देखील माझ्याप्रमाणेच तुझ्या सावलीत सुरक्षित आहे', असे अर्पिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सलमान खानच्या 'दबंग ३' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता तो 'राधे' चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. तसेच, अलिकडेच त्याने 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाचीही घोषणा केली आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.