ETV Bharat / sitara

मलायकासोबतच्या नात्याची अर्जुनने दिली कबुली, सांगितला लग्नाचा प्लॅन

अलिकडेच मलायकाने अर्जुनच्या वाढदिवशी त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला. तर, दुसरीकडे अर्जुननेही आता त्यांचे नाते ऑफिशियल केले आहे.

मलायकासोबतच्या नात्याची अर्जुनने दिली कबुली, सांगितला लग्नाचा प्लॅन
author img

By

Published : Jul 6, 2019, 10:58 AM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या प्रेमाचे वारे वाहु लागले आहेत. बऱ्याच दिवसापासून दोघांच्या नात्याची चर्चा सुरू होती. मात्र, दोघांनीही माध्यमांसमोर त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. अलिकडेच मलायकाने अर्जुनच्या वाढदिवशी त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला. तर, दुसरीकडे अर्जुननेही आता त्यांचे नाते ऑफिशियल केले आहे.

एका माध्यमाच्या मुलाखतीत बोलताना अर्जुन कपूरने त्यांच्या नात्याबद्दल बोलताना सांगितले, की दोघेही सध्या त्यांचे नाते एन्जॉय करत आहेत. एवढ्यात त्यांचा लग्नाचा काहीही प्लॅन नाही. लग्नाचे प्रेशर घेऊन त्यांना लग्न करायचे नाही, असे त्याने म्हटले आहे. आम्ही दोघेही सध्या एकमेकांसोबत कम्फरटेबल आहोत, असेही त्याने सांगितले आहे.

मलायकानेही दिली होती प्रतिक्रिया

अर्जुनसोबतच्या नात्याबाबत मलायकानेही प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली होती, की हे तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. वयाच्या अंतराचाही काही प्रभाव आपल्या नात्यावर होत नाही. अर्जुनने त्याचा वाढदिवस मलायकासोबत न्युयॉर्क येथे साजरा केला होता. त्यांचे काही फोटोदेखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.