मुंबई - चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेले बॉलीवूडचे जोडपे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा (Arjoon Kapoor breakup with Malaika Arora) यांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहेत. मालदीवमध्ये त्यांच्या रोमँटिक सुट्टीनंतर अर्जुन, मलायका यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत आहेत.
मलायका आणि अर्जुनचे नाते नेहमीच चर्चेत असते. चार वर्षांच्या नात्यात, या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. रिपोर्ट्सनुसार, मलायका जरा लांबच राहत आहे. आणि ती गेल्या सहा दिवसांपासून ती घरातून बाहेर पडली नाही. दुसरीकडे, अर्जुन कोविडशी झुंज देत आहे आणि बहीण अंशुला कपूर यांच्यासोबत घरी एकांतात आहे. मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपमागील (Arjoon Kapoor breakup with Malaika Arora) कारण अद्याप समजू शकलेले नाही.
इंडियाज बेस्ट डान्सर 2 च्या शूटला अनुपस्थिती
दरम्यान, मलायकाने इंडियाज बेस्ट डान्सर 2 च्या ग्रँड फिनालेसाठी शूटिंग सुट्टी घेतल्याने (Arjoon Kapoor breakup with Malaika Arora) अफवांना आणखी वाढ मिळाली. मलायका फिनालेला अनुपस्थित राहिली होती. कारण तिची तब्येत बरी नव्हती. मलाइकाने यापूर्वी अभिनेता-निर्माता अरबाज खानशी लग्न केले होते.
हेही वाचा - 'सेल्फी'मध्ये झळकणार अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी, पाहा घोषणेचा व्हिडिओ