ETV Bharat / sitara

कॅटरिनाने शेअर केलेल्या फोटोची अर्जुनने उडवली खिल्ली, कॅटने दिले 'हे' उत्तर - panipat

काही दिवसांपूर्वी कॅटरिनाने तिचा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया देखील मिळाल्या. मात्र, यामध्ये अभिनेता अर्जुन कपूरने केलेली कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे.

कॅटरिनाने शेअर केलेल्या फोटोची अर्जुनने उडवली खिल्ली, कॅटने दिले 'हे' उत्तर
author img

By

Published : Jul 14, 2019, 4:37 PM IST

मुंबई - बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून कॅटरिना कैफ हिला ओळखले जाते. सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. नेहमी ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने तिचा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया देखील मिळाल्या. मात्र, यामध्ये अभिनेता अर्जुन कपूरने केलेली कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे.

कॅटरिनाच्या फोटोवर अर्जुनने एक गमतीशईर कमेंट केली. मात्र, कॅटरिनानेही त्याला चांगलेच उत्तर दिले आहे. कॅटने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कोणत्यातरी बीचवर उभी असलेली पाहायला मिळते. तिचा हा बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अर्जुनने तिची फिरकी घेतली. त्याने या फोटोवर कमेंट करत लिहिले की 'बघ तु कुठे जात आहेस, आशा करतो की पोज देताना त्या खांबावर आपटणार नाहीस'. त्याच्या या कमेंटवर कॅटरिनानेही प्रतिक्रिया दिली. 'मी याबाबत काळजी घेईल', असे ती म्हणाली.

Arjun Kapoor commented on katrina kaif photo
कॅटरिनाने शेअर केलेल्या फोटोची अर्जुनने उडवली खिल्ली, कॅटने दिले 'हे' उत्तर

अर्जुन काही दिवसांपासून मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या वाढदिवशी मलायकाने त्याचासोबतचा फोटो शेअर करुन अप्रत्यक्षरित्या त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे.

तसेच, तो लवकरच 'पानिपत' चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरू आहे. तर, कॅटरिना अलिकडेच सलमान खानसोबत 'भारत' चित्रपटात दिसली. आता ती अक्षय कुमारसोबत 'सूर्यवंशी'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात तिचा 'टीप टीप बरसा' गाण्यावर डान्स देखील पाहायला मिळणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.