मुंबई - सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए.आर. रेहमान यांचे लेखन आणि निर्मिती असलेल्या '९९ साँग्स' या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. एक संगीतमय प्रेमकथा असलेला हा चित्रपट देशभरातील सर्व कलाकारांना समर्पित करत ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
विश्वेश क्रिश्नमूर्ती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातून इहान भट्ट आणि एडिल्से वरगास सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटात ते 'जय' आणि 'सोफी' हे पात्र साकारत आहेत. ट्रेलरमध्ये नवोदीत गायक आपलं संगीत आणि प्रेयसी यांच्यासाठी संघर्ष करताना दिसतो.
-
An ode to all the artists in the world 🌍, here is the trailer of #99Songs.#musicismagic#99SongsTheMovie #theatreexperiencehttps://t.co/kHLeY6VYN5@YM_Movies @jiostudios @JioCinema @idealentinc @sonymusicindia
— A.R.Rahman (@arrahman) February 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An ode to all the artists in the world 🌍, here is the trailer of #99Songs.#musicismagic#99SongsTheMovie #theatreexperiencehttps://t.co/kHLeY6VYN5@YM_Movies @jiostudios @JioCinema @idealentinc @sonymusicindia
— A.R.Rahman (@arrahman) February 18, 2020An ode to all the artists in the world 🌍, here is the trailer of #99Songs.#musicismagic#99SongsTheMovie #theatreexperiencehttps://t.co/kHLeY6VYN5@YM_Movies @jiostudios @JioCinema @idealentinc @sonymusicindia
— A.R.Rahman (@arrahman) February 18, 2020
हेही वाचा -चुलबुल्या 'स्वीटी सातारकर'चा धमाल अंदाज, ट्रेलर प्रदर्शित
तेनझिन दालहा, लिसा रे, मनिषा कोईराला, राहुल राम आणि रणजीत बरोत या कलाकारांचीही या चित्रपटात भूमिका पाहायला मिळणार आहे.
वाय एम मुव्हिज आणि आयडियल एंटरटेन्मेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर, जिओ स्टूडिओ अंतर्गत या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे.
अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली नाही. हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -'एक सांगायचंय..' नंतर दिग्दर्शक लोकेश गुप्तेच्या 'ऋणानुबंध' सिनेमाचा मुहूर्त संपन्न