ETV Bharat / sitara

कोरोना व्हायरस : पाळीव जनावरांची काळजी घेण्यासाठी प्रिती आणि अनुष्काचे आवाहन

कोरोना व्हायरसपासून पाळीव प्राण्यांचेही संरक्षण करण्याचे आवाहन अभिनेत्री प्रिती झिंटा आणि अनुष्का शर्माने केले आहे.

Anushka and Prity
प्रिती आणि अनुष्का
author img

By

Published : Mar 24, 2020, 6:57 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे अभिनेत्री प्रिती झिंटा आणि अनुष्का शर्मा चिंतीत झाल्या आहेत. प्राण्यांमुळे व्हायरस पसरतो अशा अफवा असल्यामुळे पाळीव प्राण्यांनाही धोका असल्याचे त्यांनी म्हटलंय.

अनुष्काने आपल्या सोशल मीडियावरुन लोकांना आवाहन करताना लिहिलंय, ''ज्यांच्या घरी पाळीव जनावरे आहेत त्यांना विनंती आहे की, संकटाच्या या प्रसंगी पाळीव जनावरांची काळजी घ्या. तुम्ही त्यांचे रक्षण करा आणि सुरक्षित ठेवा. त्यांना सोडून देणे अमानवी आहे.''

Anushka and Prity  request people
अनुष्काचे आवाहन

अनुष्का शर्मा ही प्राणीमित्र कार्यकर्ती आहे. तिने नेहमीच प्राण्यांबद्दल आपले प्रेम व्यक्त करताना त्यांची हिंसा होऊ नये यासाठी आपला आवाज उठवला आहे.

दुसरीकडे प्रिती झिंटाने आपला एक फोटो शेअर करीत पोस्ट लिहिली आहे.

ती लिहिते, ''सोशल मीस्टन्सिंग ही गोष्ट सर्वात चांगली आहे. याचा उपयोग आपण कोरोना व्हायरसशी लढताना करु शकतो.''

ती पुढे लिहिते, ''विशेषतः जेव्हा या व्हायरसचा प्रसार प्राण्यांपासून होत नाही हो माहिती असताना, आपल्या पाळीव प्राण्यांना सोडणे अमानवी गोष्ट आहे, जी कोणीही करु शकतो. सुरक्षित रहा, आपल्या पाळीव प्राण्यांवर प्रेम करा.''

कोरोना व्हायरस प्राण्यांमुळे पसरत नाही, याबद्दल यापूर्वी लेखिका ट्विंकल खन्ना आणि अर्जुन कपूर यांनी लोकांना आश्वस्त केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.