ETV Bharat / sitara

'सात वर्षापूर्वी 'या' चित्रपटाने माझे आयुष्य बरबाद केले', अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट - tigmanshu dhuliya

अनुरागच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाने 'कल्ट' चित्रपटाचा दर्जा मिळवला होता. सप्तवर्षपूर्तीनिमित्त अनुरागने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून मात्र, एक खंत व्यक्त केली आहे.

'सात वर्षापूर्वी 'या' चित्रपटाने माझे आयुष्य बरबाद केले', अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट
author img

By

Published : Jun 23, 2019, 9:48 AM IST

मुंबई - दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटामुळे त्याला तुफान लोकप्रियता मिळाली. अलिकडेच या चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, 'याच चित्रपटामुळे माझं आयुष्य बरबाद झालं', असे अनुरागने त्याच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

अनुरागच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाने 'कल्ट' चित्रपटाचा दर्जा मिळवला होता. सप्तवर्षपूर्तीनिमित्त अनुरागने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून मात्र, एक खंत व्यक्त केली आहे. 'या चित्रपटामुळे माझे आयुष्य बरबाद झाले. या चित्रपटापासून मी एकाच प्रकारचे चित्रपट करावे, अशी अपेक्षा प्रेक्षक करतात. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मी पूर्णत: अपयशी झालो आहे. मी आशा करतो की २०१९ मध्ये तरी माझ्या मागची साडेसाती संपून जावी', असे त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हुमा कुरेशीने केले होते पदार्पण

गँग्स ऑफ वासेपूरमधून हुमा कुरेशीने बॉलिवूड पदार्पण केले होते. या चित्रपटाची कथा दोन भागात प्रदर्शित झाली होती. बिहार आणि आता झारखंडमधील वासेपूर शहरतील ही कथा होती. या चित्रपटात हुमासोबत, मनोज बाजपेयी, ऋचा चढ्ढा, नवाजुद्दीन सिद्दीकी, पियूष मिश्रा, तिग्मांशु धूलिया, राज कुमार राव आणि पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत होते.

अनुराग आता 'सांड की आँख' या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात शार्प शूटर दादी चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांची कथा दाखवण्यात येणार आहे. तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.