मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचा आगामी 'वन डे' या चित्रपटात ते भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
![Anupam Kher, Esha Gupta and Kumud Mishra starer one day poster](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3168241_od2.jpg)
'जस्टीस डिलिव्हर्ड', 'प्रत्येक गुन्ह्यामागे एक कथा दडलेली असते', अशी टॅगलाईन या पोस्टरवर देण्यात आली आहे. अशोक नंदा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात अनुपम खेर हे वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री ईशा गुप्ता ही देखील बऱ्याच काळानंतर पडद्यावर झळकणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती केतन पटेल आणि स्वाती सिंग हे करत आहेत. हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.