ETV Bharat / sitara

'शाहिस्तेखान व्यक्ती म्हणून कसा असेल तेच साकारण्याचा प्रयत्न केला'

'क्राईम पेट्रोल' फेम अनूप सोनी आता चक्क 'फत्तेशिकस्त' या सिनेमातून शाहिस्तेखानाच्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे.

'शाहिस्तेखान व्यक्ती म्हणून कसा असेल तेच साकारण्याचा प्रयत्न केला'- अनुप सोनी
author img

By

Published : Nov 1, 2019, 7:24 PM IST

मुंबई - 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातून अभिनेता अनूप सोनी हे पहिल्यांदा मराठी चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. 'क्राईम पेट्रोल' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला हा चेहरा आता चक्क 'फत्तेशिकस्त' या सिनेमातून शाहिस्तेखानाच्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे.

'मराठी सिनेमात काम करण्याची मला खूप इच्छा होती. यापूर्वी मी एका बंगाली सिनेमात काम केलं होतं. मात्र, दिगपाल लांजेकर माझ्याकडे 'फत्तेशिकस्त' या सिनेमाची कथा घेऊन आले. सिनेमा मराठी असूनही मला मराठी बोलावं लागणार नव्हतं, त्यामुळे मला क्षणभर आश्चर्य वाटलं. मात्र, नंतर त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगावर हा चित्रपट आधारित आहे. त्यानंतर त्यांनी मला पूर्ण कथा आणि सिनेमाची संपूर्ण संहिता हातात ठेवली आणि ती वाचल्यावर आणि या भूमिकेचं महत्त्व लक्षात आल्यावर आपण लगेच ही भूमिका करायला होकार दिला', असं अनूप सोनी यांनी सांगितलं.

अनूप सोनी यांची मुलाखत

हेही वाचा -'तिढा सुटे पर्यंत अनिल कपूरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा'

आजवर अनूप यांनी अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. तरीही दिगपाल हा आपल्याला अजिबात नवखा वाटला नाही, असं त्यांनी आवर्जून नमूद केलं. त्याला जे करायचं होतं. ते त्याला निश्चित माहीत होतं. मला स्वतःला काम करताना दिग्दर्शक नवा की जुना याने फरक पडत नाही. मात्र, त्याची त्याच्या कामावर किती पकड आहे? याने निश्चितच फरक पडतो, असं अनूप यांनी स्पष्ट केलं

मराठी सिनेसृष्टी खूप बदलली आहे. गेल्या ५ वर्षात अनेक उत्तम चित्रपट या इंडस्ट्रीत तयार झालेत. त्यासोबतच येथे उत्तमोत्तम अभिनेत्याची एक मोठी परंपरा आहे. त्यामुळे काम करायला खूप मज्जा येते आणि समाधान सुद्धा मिळतं. 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात आपण क्रूरकर्मा शाहिस्तेखानाच्या भूमिकेत असलो तरीही तो माणूस म्हणून नक्की कसा असेल, त्याची विचार करण्याची पद्धत कशी असेल. तो जे करतोय ते कितीही चुकीचं असलं, तरीही ते त्याच्यासाठी किती बरोबर होतं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा -'भारत'नंतर दिशा पटाणीची पुन्हा सलमानसोबत वर्णी, या चित्रपटात झळकणार एकत्र

'फत्तेशिकस्त' या सिनेमाने कामाच समाधान मिळवून दिलं असून आपलं काम लोकांनाही नक्की आवडेल, असा विश्वास अनूप सोनी यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -प्रथमेश परब सिनेमासाठी होणार 'टल्ली'

Intro:'फत्तेशिकस्त' या सिनेमाद्वारे अभिनेता अनुप सोनी हे पहिल्यादा मराठी सिनेमात काम करतांना दिसणार आहेत. 'क्राईम पेट्रोल' या कार्यक्रमामुळे घराघरात माहितीचा झालेला हा चेहरा आता चक्क 'फत्तेशिकस्त' या सिनेमातून शाहिस्तेखानाच्या भूमिकेतुन आपल्या भेटीला येणार आहे.

मराठी सिनेमात काम करण्याची मला खूप इच्छा होती यापूर्वी मी एका बंगाली सिनेमात काम केलं होतं. मात्र दिगपाल लांजेकर माझ्याकडे 'फत्तेशिकस्त' या सिनेमाची कथा घेऊन आले आणि म्हनाले की सिनेमा मराठी आहे पण तुम्हाला मराठी बोलायचं नाही आहे तेव्हा मला क्षणभर आश्चर्य वाटलं होतं. मात्र नंतर त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगावर हा सिनेमा आधारित आहे. त्यानंतर त्यांनी मला पूर्ण कथा आणि सिनेमाची संपूर्ण संहिता हातात ठेवली आणि ती वाचल्यावर आणि या भूमिकेचं महत्त्व लक्षात आल्यावर आपण लगेच ही भूमिका करायला होकार दिला.

आजवर अनुप यांनी अनेक दिग्दर्शकसोबत काम केलेले असले तरीही दिगपाल हा आपल्याला अजिबात नवखा वाटला नाही असं त्यांनी आवर्जून नमूद केलं. त्याला जे करायचं होतं ते त्याला निश्चित माहीत होतं. मला स्वतःला काम करताना दिग्दर्शक नवा की जुना याने फरक पडत नाही मात्र त्याची त्याच्या कामावर किती पकड आहे याने निश्चितच फरक पडतो, अस अनुप यांनी स्पष्ट केलं. मात्र याबाबतीत आपण दिगपाल याना पूर्ण मार्क देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

मराठी सिनेसृष्टी खूप बदलली आहे गेल्या 5 वर्षात अनेक उत्तम सिनेमे या इंडस्ट्रीत तयार झालेत. त्यासोबतच इथे उत्तमोत्तम अभिनेत्याची एक मोठी परंपरा आहे त्यामुळे काम करायला खूप मज्जा येते आणि समाधान सुद्धा मिळतं. फत्तेशिकस्त या सिनेमात आपण क्रूरकर्मा शाहिस्तेखानाच्या भूमिकेत असलो तरीही तो माणूस म्हणून नक्की कसा असेल त्याची विचार करण्याची पद्धत कशी असेल. तो जे करतोय ते कितीही चुकीचं असलं तरीही ते त्याच्यासाठी किती बरोबर होत ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

'फत्तेशिकस्त' या सिनेमाने कामाच समाधान मिळवून दिल असून आपलं काम लोकांनाही नक्की आवडेल असा विश्वास अनुप सोनी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी..

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.