मुंबई - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त रूग्ण सापडले आहेत. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार अनेक दानशूर व्यक्ती समोर येताना दिसत आहेत.
आज सुप्रसिद्ध गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी पुढे येत दोन लाखांची मदत केली आहे. तसेच जे जे रुग्णालयातील परिचारिका यांना लागणारा एप्रेन देखील देण्याबाबत पौडवाल तयार झाल्या आहेत.
सध्या जगभर वाढलेल्या कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. देशामध्ये आणि विशेषतः मुंबई मध्ये दिवसेंदिवस कोरोना ग्रस्त रुग्णाची संख्या वाढत आहे. हे लक्षात घेऊन जे जे रुग्णालयामध्ये त्यांच्यावर तातडीचे उपचार करण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री घेण्यासाठी पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या वतीने देणगी देण्यात आली. यावेळी जे जे हॉस्पिटलच्या अधिक्षक डॉ. संजय सुरसे, डॉ. दिलीप गवरी , मुख्य मेडिकल सोशल वर्कर विभुते, तसेच नाना पालकर स्मृती समितीचे व्यवस्थापक कृष्णा महाडिक उपस्थित होते.