ETV Bharat / sitara

दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ मालिकेतील अजून एक चित्रपट, 'शेर शिवराज है'!

author img

By

Published : Feb 19, 2021, 5:43 PM IST

शिवराज अष्टक ही आठ चित्रपटांची मालिका दिग्पाल लांजेकर सादर करणार आहे, यातील 'शेर शिवराज है' हा सिनेमा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याच कारणामुळे दिग्पाल सध्या या सिनेमाची जोरदार तयारी करत आहे. आठ चित्रपटांपैकी 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या दोन चित्रपटांचे दिग्पाल आणि त्याच्या टीमने उत्तम सादरीकरण केले असून, 'जंगजौहर' हा तिसरा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे

-shivraj-ashtak-
शिवराज अष्टक

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. त्यांचा इतिहास स्फूर्तिदायक असून त्यांच्या ‘गनिमी-कावा’ मोहीम आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील प्रसिद्ध आहेत. जगभरातील बऱ्याच देशांच्या सैन्य दल अभ्यासक्रमांमध्ये अफझलखान वध प्रकरणाचा समावेश असून, यातील शिवरायांच्या रणनीतीचे प्रशिक्षण सैनिकांना दिले जाते. गनिमी काव्याने लढलेल्या या युद्धातील विविध कंगोरे सैनिकांना समजावून सांगितले जातात. साहजिकच त्यांच्या लढाईच्या मोहिमांवरील चित्रपटांची संख्या बरीच जास्त आहे तरीही त्या विषयावर नवनवीन चित्रपट अजूनही बनतच असतात. ‘फर्जंद’, ‘फतेहशिकस्त’ आदी शिवकालीन ऐतिहासिक चित्रपटांचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर एक नवीन चित्रपट, 'शेर शिवराज है', घेऊन येताहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील वेगवेगळे टप्पे चित्रपटरूपाने जनतेसमोर आणणारा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर आता शिवचरित्रातील एक नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज झाला आहे.

शिवराज अष्टक ही आठ चित्रपटांची मालिका दिग्पाल सादर करणार आहे, यातील 'शेर शिवराज है' हा सिनेमा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याच कारणामुळे दिग्पाल सध्या या सिनेमाची जोरदार तयारी करत आहे. आठ चित्रपटांपैकी 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या दोन चित्रपटांचे दिग्पाल आणि त्याच्या टीमने उत्तम सादरीकरण केले असून, 'जंगजौहर' हा तिसरा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अफझलखानाचा वध हा केवळ शत्रूचा वध नव्हता, तर शिवाजी महाराजांनी त्यात उत्तम युद्धतंत्र आणि मानसिक दबावतंत्राचा अंतर्भाव केला होता. दिग्पालने आपल्या सिनेमांमधून शिवाजी महाराजांची वेगवेगळी रूपं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 'फर्जंद' या सिनेमात शिवराय मार्गदर्शकाच्या रूपात होते तर 'फत्तेशिकस्त'मध्ये स्वत: मैदानात उतरून नेतृत्व करताना रणनीतीज्ञाच्या भूमिकेत दिसले.

इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है।तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यो म्लेंछ बंस पर शेर शिवराज है। हे कवी भूषण यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेले छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करणारे काव्य बऱ्याच शिवभक्तांना मुखोदगत आहे. या काव्यातील 'शेर शिवराज है' हे धृपद आता चित्रपटाचे शीर्षक आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटरने अर्काइव्ह करण्याची प्रोसेस केल्यानंतर सैन्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांशी दिग्पालचा संपर्क आला. त्याने प्रेरित होऊन दिग्पाल 'शेर शिवराज है' या चित्रपटासाठी खूप अभ्यास आणि रिसर्च करत आहे.

उत्तम मानसशास्त्र जाणणारा रणनीतीज्ञ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेच रूप 'शेर शिवराज है' या चित्रपटात सादर करण्याचा प्रयत्न दिग्पाल करणार आहे. रयतेसाठी कनवाळू, श्रद्धा असलेला राजा ही जनतेच्या मनातील छत्रपतींची रूपेही प्रामुख्याने या सिनेमाद्वारे समोर येतील. त्याचबरोबर महाराजांचे भौगोलिक ज्ञान किती उत्तम होते हे देखील 'शेर शिवराज है' या सिनेमात पहायला मिळेल. या सिनेमाची पटकथा लिहून पूर्ण झालेली असून, लवकरच निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दिग्पाल सध्या 'शेर शिवराज है' सिनेमाचे पहिले पोस्टर व टीझरही लवकरच रसिकांच्या भेटीला आणण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा - रणवीर सिंगच्या 'सर्कस'मध्ये झळकणार दीपिका पदुकोण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.