मुंबई - बॉलिवूडची 'क्विन' कंगना रनौत ही सध्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाशिवाय ती आगामी 'पंगा' चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकतेच या चित्रपटातील नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच, चित्रपटाच्या ट्रेलरचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
कंगना रनौत, जस्सी गील, रिचा चढ्ढा आणि निना गुप्ता यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. २३ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जो सपने देखते है वो पंगा लेते है', असे कॅप्शन देऊन या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. 'पंगा' हा एक स्पोर्ट ड्रामा आहे. यामध्ये कंगना कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
#KanganaRanaut, #JassieGill, #RichaChadha and #NeenaGupta... New poster of #Panga... #PangaTrailer drops on 23 Dec 2019... Directed by Ashwiny Iyer Tiwari... Produced by Fox Star Studios... 24 Jan 2020 release. pic.twitter.com/jzIiHZMMWK
— taran adarsh (@taran_adarsh) December 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#KanganaRanaut, #JassieGill, #RichaChadha and #NeenaGupta... New poster of #Panga... #PangaTrailer drops on 23 Dec 2019... Directed by Ashwiny Iyer Tiwari... Produced by Fox Star Studios... 24 Jan 2020 release. pic.twitter.com/jzIiHZMMWK
— taran adarsh (@taran_adarsh) December 19, 2019#KanganaRanaut, #JassieGill, #RichaChadha and #NeenaGupta... New poster of #Panga... #PangaTrailer drops on 23 Dec 2019... Directed by Ashwiny Iyer Tiwari... Produced by Fox Star Studios... 24 Jan 2020 release. pic.twitter.com/jzIiHZMMWK
— taran adarsh (@taran_adarsh) December 19, 2019
हेही वाचा -चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'दंबग ३'ची टीम हैदराबादमध्ये दाखल
अश्विनी अय्यर तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, फॉक्स स्टार स्टूडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'महाभारता'तील शकुनी मामासोबत ईटीव्ही भारतची खास बातचीत