ETV Bharat / sitara

अंकिताने उलगडले तिच्या लव्ह लाईफचे गुपीत, वाचा काय आहे? - love

अंकिताने 'मणिकर्णिका' चित्रपटातून बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली आहे. या चित्रपटात तिने  'झलकारी बाई'ची भूमिका साकारली होती. अलिकडेच तिने एका माध्यमाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

अंकिताने उलगडले तिच्या लव्ह लाईफचे गुपीत, वाचा काय आहे?
author img

By

Published : Jun 30, 2019, 10:53 AM IST

मुंबई - छोट्या पडद्यावरून 'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अंकिता लोखंडेची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिने 'मणिकर्णिका' चित्रपटातून बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली. या चित्रपटात तिने 'झलकारी बाई'ची भूमिका साकारली होती. अलिकडेच तिने एका माध्यमाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने तिचा सुरुवातीचा काळ, तिला आवडणाऱ्या गोष्टी आणि लव्ह लाईफबद्दल चर्चा केली.

अंकिताने या कार्यक्रमात सांगितले, की ती चवथीत असतानाच तिने अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. तेव्हाच तिने मला मोठेपणी अभिनेत्री व्हायचे, असे घरच्यांना सांगितले होते. त्यानंतर ती पुढे मुंबईत आली. येथून तिने तिच्या अभिनयाला सुरुवात केली. 'पवित्र रिश्ता' मालिकेत तिने अर्चनाची भूमिका साकारली होती. त्यामुळे तिने 'अर्चना' म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात लोकप्रियता मिळवली.

या मालिकेतून सुशांत सिंग राजपूत आणि तिच्या नात्याची सुरुवात झाली होती. बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. याबद्दल बोलताना ती म्हणाली, मी रिलेशनशिपवर जास्त काही बोलू शकत नाही. कारण, प्रत्येकाला आपल्या अनुभवावरूनच शिकत जावे लागते. कोणीही आपल्या नात्याबद्दल आपल्याला सल्ले देऊ शकत नाही. त्यासाठी आपणच आपल्या चुकांमधून शिकत राहीले पाहिजे, असे तिने यावेळी म्हटले.

सुशांत आणि अंकिता जवळपास ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघेही वेगळे झाले. याबद्दल दोघेही माध्यमांसमोर बोलण्यास टाळाटाळ करतात. आता अंकिताच्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. एका उद्योगपतीला ती डेट करत असल्याचा सध्या चर्चा आहेत. तर, दुसरीकडे सुशांत सिंग राजपूत त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.