ETV Bharat / sitara

Aniket VishwasRao : 'चमेली' तून पदार्पण केलेल्या अनिकेतचा जाणून घ्या जीवनप्रवास...

अभिनेता अनिकेत विश्वासरावची पत्नी स्नेहा चव्हाण हिने पती, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव (Aditi Vishwasrao) या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अनिकेतवर पत्नीने आरोप केल्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

अनिकेत विश्वासराव
अनिकेत विश्वासराव
author img

By

Published : Nov 17, 2021, 12:24 PM IST

Updated : Nov 17, 2021, 3:00 PM IST

मुंबई - प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे. त्याच्या आई-वडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाण (Sneha Chavan) ने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station Pune) गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता अनिकेत विश्वासरावची पत्नी स्नेहा चव्हाण हिने पती, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव (Aditi Vishwasrao) या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अनिकेतवर पत्नीने आरोप केल्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे..

विश्वासराव यांचा जन्म 7 मे 1981 मध्ये मुंबईत झाला. शिक्षण मुंबईतील सेंट फ्रान्सिस हायस्कूल (St. Francis High School), बोरिवली येथे झाले. पुढे एम.एल. डहाणूकर महाविद्यालयात त्यांचे शिक्षण चालू राहिले. मराठी अभिनेत्री पल्लवी सुभाषसोबत (Pallavi Subhash) विश्वासराव अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ते सुमारे आठ वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते, असे सांगितले जाते. त्यांनी दोघांनी मात्र वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

हिंदी मालिका 'चमेली'तून पदार्पण -

अनिकेत हा मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi film industry) त्यांच्या कामासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्याने हिंदीत देखील काम केले आहे. सुधीर मिश्रा (Sudhir Mishra) यांच्या चमेली (chameli) या हिंदी मालिकेतून 2003 मध्ये त्याने पडद्यावर पदार्पण केले. तसेच 2004 मध्ये 'हवा आने दे' (Hava Hney dey) या पहिल्या हिंदी चित्रपटात आपली छाप उमटवली. अनिकेतने 2015 मध्ये 'हम बाजा बजा देंगे' या चित्रपटात देखील सुरेख अभिनय केला आहे.

मराठी कलाविश्वात उमटविला ठसा -

अनिकेत विश्वासराव 'लपून छपून' (Lapoon Chhapoon) (2007) या मराठी सिनेमात पहिल्यांदा दिसला. 2011 मध्‍ये 'फक्‍त लढ म्‍हणा' या चित्रपटाने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. त्याचप्रमाणे बघतोस काय मुजरा कर, पोस्टर गर्ल, आघात, लाडी-गोडी, नो एन्ट्री पुढे धोका आहे इत्यादींसारख्या हिट चित्रपटात काम करण्याची त्याला संधी मिळाली. विश्वासराव टीव्ही मालिका आणि चित्रपट दोन्हीमध्ये दिसले आहेत, तरीही ते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांच्या 'फक्त लढ म्हना' मधील अॅलेक्सच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत, ज्याचे दिग्दर्शन सिनेमॅटोग्राफर संजय जाधव (Directed by Cinematographer Sanjay Jadhav) यांनी केले होते. अनिकेतने 'स्टोरी है पन खरी है' या चित्रपटातही भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे बिग बॉस मराठी-सिझन 2 मध्ये पाहुणे म्हणून दिसला होता. विश्वासने नाटकात देखील सुंदर अभिनय केला आहे. त्याचे लव्ह बर्ड, सूर्याची पिले, नकळत सारे घडले या नाटकांमधील भूमिका प्रसिद्ध आहेत.

Last Updated : Nov 17, 2021, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.