मुंबई - अभिनेता अंगद बेदीने आपली एक्स गर्लफ्रेंड नोरा फतेही हिचे कौतुक केले आहे. अभिनेत्री नेहा धुपिया हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी त्याचे नोरासोबत अफेअर होते.
अंगद बेदीच्या म्हणण्यानुसार त्याने नोरासोबत जुळवून घेण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु हे नाते टिकणे कठीण होते. अंगद म्हणाला, ''काही नाती अशी असतात की टिकू शकत नाहीत. परंतु ती टिकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. नोरा एक चांगली मुलगी आहे. आपल्या करियरमध्ये ती उत्तम काम करीत आहे. तिला याकाळात स्टारडम मिळत असून मी त्यासाठी तिला शुभेच्छा देतो.''
अंगद म्हणतो, ''आम्ही दोघे एकत्र राहणे आमच्या नशिबातच नव्हते. ती ज्या प्रकारच्या मित्राची आस धरुन आहे तो तिला लवकरच मिळेल.''
अंगद आणि नोरा यांनी २०१६ पासून वर्षभर डेटींग केले. २०१८ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर लगेचच त्याने नेहा धुपियासोबत विवाह केला.