मुंबई - अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याची छापही चाहत्यांवर पाडली आहे. सोशल मीडियावर ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या गणेशोत्सवानिमित्त अमृतानेही मराठमोळ्या लूकमध्ये तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचा हा लूक पाहुन सोशल मीडियात तिच्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
अमृताला साड्यांची प्रचंड आवड आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमधूनही तिची ही आवड पाहायला मिळते. मराठमोळा श्रृंगार करुन तिने हे फोटो शेअर केले आहेत.
![Amruta khanvilkar saree look on ganesh festival](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4329602_a1.jpg)
![Amruta khanvilkar saree look on ganesh festival](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4329602_a2.jpg)
गणेशाच्या मूर्तीसमोरचाही एक फोटो तिने शेअर केला आहे.
![Amruta khanvilkar saree look on ganesh festival](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4329602_a4.jpg)
![Amruta khanvilkar saree look on ganesh festival](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4329602_a3.jpg)
अमृता काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावरील 'जीवलगा' मालिकेत काव्याच्या भूमिकेत झळकली होती. तिच्या भूमिकेचं फार कौतुकही झालं. या मालिकेतही तिचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला होता. तसेच, आता 'खतरों के खिलाडी'च्या दहाव्या पर्वातही ती सहभागी होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">