मुंबई : "मलंग"ची अभिनेत्री अमृता खानविलकरने कोविड 19 विरुद्धच्या लढाईसाठी आपले योगदान दिले आहे. बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातील कलाकार आपल्या क्षमतेनुसार मदत करीत आहेत. यात आता अमृताचेही नाव सामील झाले आहे. तिने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री निधीसाठी १ लाख रुपयांची रक्कम दान केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अमृताने म्हटलंय, ''अशावेळी छोटे योगदान देण्यातही सक्षम वाटते. जग गंभीर धोक्यात आहे. आपण भारतात पहिल्या अवस्थेमध्येच या रोगापासून वाचणे आवश्यक आहे.
''परिणाम घातक आहेत आणि पूर्ण देशातील नागरिकांच्या समर्थनाची गरज आहे. जितके शक्य आहे तितकी मदत करण्याचे मी आवाहन करते. सरकारी आदेशांचे सक्तीने पालन करा. जोपर्यंत फार आवश्यकता नाही तोपर्यंत घरीच थांबा. चला एकसाथ होऊन कोरोना व्हायरसशी लढूयात, सर्वांना सुरक्षित ठेवूयात.''