ETV Bharat / sitara

तामिळ, संस्कृत, तेलुगुच्या तुलनेत हिंदी भाषा ही बाल्यावस्थेत - कमल हासन - Among the family of languages, the youngest is Hindi

तामिळ , तेलुगु, संस्कृतच्या तुलनेत ही भाषा अजूनही कमी वयाची आहे, असे कमल हासन यांनी म्हटलंय. या भाषेची आम्ही काळजी घेऊ कारण हे आमचेच बाळ आहे, असेही त्यांनी पुढे म्हटलंय.

कमल हासन
author img

By

Published : Oct 3, 2019, 11:28 PM IST

चेन्नई - तामिळ, संस्कृत आणि तेलुगु या भाषेच्या तुलनेत हिंदी भाषा कमी वयाची असल्याचे विधान तामिळ अभिनेता आणि मक्कल निधी मायेम पक्षाचे नेते कमल हासन यांनी केलं आहे. अलिकडेच हिंदी भाषा दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर हासन यांच्या या विधानाकडे पाहिले जात आहे.

हिंदी भाषा ही लंगोट घालणाऱ्या लहान बाळासारखी आहे. या भाषेची आम्ही काळजी घेऊ कारण हे आमचेच बाळ आहे. तामिळ , तेलुगु, संस्कृतच्या तुलनेत ही भाषा अजूनही कमी वयाची आहे, असे कमल हासन यांनी पुढे म्हटलंय.

देशाला एका भाषेची गरज आहे. जेणेकरून परेदशी भाषांना भारतामध्ये स्थान मिळणार नाही, असे अमित शाह एका कार्यक्रमामध्ये म्हणाले होते. त्यानंतर दक्षिणेतील प्रादेशिक राजकीय पक्ष आक्रमक झाले होते.

'एक देश-एक भाषा'ची घोषणा करत, देशाला एका भाषेची गरज आहे, असे म्हणणाऱ्या अमित शाह यांनी विरोध सुरू झाल्यानंतर कोलांट उडी घेत, आपण हिंदीची सक्ती करावी असे म्हणलो नव्हतो असे स्पष्ट केले होते.

Intro:Body:

ent. marathi

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.