मुंबई - वडील आणि मुलीचे नाते हे शब्दात व्यक्तच करता येत नाही. आपल्या मुलीशी वडिलांचा एक अनोखा जिव्हाळा असतो. महानायक अमिताभ बच्चन यांचादेखील त्यांच्या मुलीशी अशाचप्रकारचा जिव्हाळा आहे. सोशल मीडियावर ते फार सक्रिय असतात. त्यांच्या बऱ्याच जुन्या आठवणींना ते सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देतात. त्यांची मुलगी श्वेता हिचा एक फोटो शेअर करुन त्यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.
अमिताभ यांनी श्वेताचा एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे, की 'एक दिवस अशी होती, कधी मोठी झाली समजलंच नाही....'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रन्ट बाबत बोलायचे झाले तर, काही महिन्यांपूर्वीच ते 'बदला' चित्रपटात दिसले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता ते 'चेहरे' आणि 'गुलाबो सितोबो'मध्ये भूमिका साकारत आहेत. 'चेहरे' चित्रपटात ते इमरान हाश्मीसोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. तर, 'गुलाबो सिताबो'मध्ये आयुष्मान खुरानासोबत भूमिका साकारणार आहेत. या दोन्हीही चित्रपटातील त्यांचे लूक प्रदर्शित झाले आहेत.