मुंबई - काही दिवसांपासून उशीरा हजेरी लावलेल्या पावसाने मुंबईतील नागरिकांची दाणादाण उडवली होती. मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. बऱ्याच परिसरात पाणी साचले होते. या पावसामुळे लोकलसेवादेखील ठप्प झाली होती. अशातच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरून या पावसावर एक मजेदार मीम पोस्ट केले आहे. या पोस्टवर चाहतेही मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी झिनत अमान यांच्यासोबत 'द ग्रेट गँबरल' या चित्रपटात भूमिका साकारली होती. याच चित्रपटाचे 'दो लफ्जो की कहानी' या गाण्यातील एक स्नॅपशॉट त्यांनी शेअर करत गमतीशीर कॅप्शन दिले आहे. यामध्ये दोघेही नावेतून प्रवास करताना दिसत आहेत. यावर त्यांनी लिहिलंय, की 'जलसा होते हुये' आणि ते नाववाल्याला सांगताहेत, की 'भैय्या गोरेगाव लेना'.
-
T 3... Jalsa hote hue .. pic.twitter.com/PKSZuQm7ju
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">T 3... Jalsa hote hue .. pic.twitter.com/PKSZuQm7ju
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 2, 2019T 3... Jalsa hote hue .. pic.twitter.com/PKSZuQm7ju
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 2, 2019
अमिताभ यांचा 'जलसा' बंगला जुहू येथे आहे. मुंबईत अनेक भागात पाणी साचल्यामुळे पूरसदृष्य परिस्थिती आहे. त्यामुळे घरातून बाहेर निघताना नावेतून प्रवास करावा लागणार, या अर्थाने त्यांनी हे मीम शेअर केले आहे.