अमिताभ बच्चन यांचे हिंदी भाषेवर किती प्रभूत्व आहे हे आपण अनेकवेळा पाहिलं आहे. अस्खलित हिंदी त्यांच्या तोंडून ऐकणे ही एक पर्वणी असते. अनेकवेळा वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कविता ते सादर करीत असतात. त्यामुळे ते हिंदी लिहिण्या बोलण्यात चूक करु शकतील अशी शक्यता दूरवर नसते. मात्र माणसाच्या हातून चूका या होतच असतात, त्याला अमिताभ बच्चनही अपवाद नाहीत.
तर घडले असे की अमिताभ बच्चन यांनी दसऱ्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी ‘दशहरा’ लिहिण्याएवजी ‘दशहेरा’ लिहिलं होतं. नेमकी ही चूक राजेश पांडे नामक व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फेसबुकवर बिग बींच्या पोस्टवर प्रतिक्रिया लिहिली. इतकेच नाही तर या पांडे साहेबांनी ”खुदा गवाह” या सिनेमात अमिताभ यांनी ‘पेशेवर मुजरिम’ म्हणण्याएवजी ‘पेशावर मुजरिम’ म्हंटलं होतं असे त्याने ध्यानात आणून दिलं.
अमिताभ बच्चन यांनी राजेश पांडे या व्यक्तीच्या प्रतिक्रियेची दखल घेतली आहे. आपल्याकडून झालेल्या चूकी बद्दल माफी मागत पुढे चूक सुधारणार असल्याचं म्हंटलंय. तसचं चूक लक्षात आणून दिल्याबद्दल या तरुणाचे आभार देखील मानले आहेत.
हेही वाचा - Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टनसीसाठी 'भोपळ्या'वरुन राडा