मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. कलाकार आणि खेळाडूंनंतर आता राजकीय नेत्यांवरही आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात ठाकरे आणि द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पीएम मोदी असे या बायोपिकचे शीर्षक असणार आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात मोदींच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. आता यापाठोपाठ चित्रपटाचे दुसरे पोस्टर अमित शाह यांच्या उपस्थितीत लाँच केले जाणार आहे.
#NewsUpdate: Amit Shah to launch second poster of #PMNarendraModi on 18 March 2019 in Delhi... Stars Vivek Anand Oberoi in title role... Directed by Omung Kumar... Produced by Suresh Oberoi, Sandip Ssingh, Anand Pandit and Acharya Manish... 12 April 2019 release.
— taran adarsh (@taran_adarsh) March 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#NewsUpdate: Amit Shah to launch second poster of #PMNarendraModi on 18 March 2019 in Delhi... Stars Vivek Anand Oberoi in title role... Directed by Omung Kumar... Produced by Suresh Oberoi, Sandip Ssingh, Anand Pandit and Acharya Manish... 12 April 2019 release.
— taran adarsh (@taran_adarsh) March 16, 2019#NewsUpdate: Amit Shah to launch second poster of #PMNarendraModi on 18 March 2019 in Delhi... Stars Vivek Anand Oberoi in title role... Directed by Omung Kumar... Produced by Suresh Oberoi, Sandip Ssingh, Anand Pandit and Acharya Manish... 12 April 2019 release.
— taran adarsh (@taran_adarsh) March 16, 2019
दिल्लीमध्ये १८ मार्चला हा कार्यक्रम पार पडणार आहे. या बायोपिकमध्ये मनोज जोशी अमित शाहंची भूमिका साकारणार आहेत. उमंग कुमार यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सुरेश ओबेरॉय आणि संदिप सिंग या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.