मुंबई - दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगुबाई काठीवाडी' चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरू होते. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
'गंगुबाई काठीवाडी' चित्रपटाच्या निमित्ताने आलिया भट्ट पहिल्यांदाच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी ती सलमान खानसोबत 'ईन्शाल्ला' चित्रपटात दिसणार होती. संजय लीला भन्साळीच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. मात्र, काही कारणास्तव सलमानने या चित्रपटातून माघार घेतली. त्यामुळे आलिया भट्ट आता त्यांच्या 'गंगुबाई काठीवाडी'मध्ये भूमिका साकारणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
-
Sanjay Leela Bhansali commences shooting of his new film #GangubaiKathiawadi... Stars #AliaBhatt in title role... 11 Sept 2020 release. pic.twitter.com/OZ5jWCGcM8
— taran adarsh (@taran_adarsh) December 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sanjay Leela Bhansali commences shooting of his new film #GangubaiKathiawadi... Stars #AliaBhatt in title role... 11 Sept 2020 release. pic.twitter.com/OZ5jWCGcM8
— taran adarsh (@taran_adarsh) December 27, 2019Sanjay Leela Bhansali commences shooting of his new film #GangubaiKathiawadi... Stars #AliaBhatt in title role... 11 Sept 2020 release. pic.twitter.com/OZ5jWCGcM8
— taran adarsh (@taran_adarsh) December 27, 2019
हेही वाचा -'मुंह दिखाई २.०' मधून दीपिकाने उलगडला 'छपाक'चा प्रवास
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ११ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. आलियाने देखील सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही आपल्याला सॅन्ताक्लॉजने दिलेली भेट असल्याचं म्हटलं आहे.
गंगुबाई काठीवाडी हा एक बायोग्राफिकल चित्रपट आहे. हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्विन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित हा चित्रपट राहणार आहे.
संजय लीला भन्साळींनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तसेच, त्यांच्या निर्मितीखाली आणि दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. दीपिका पदुकोण, रणबीर कपूर यांचीही यामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका राहणार असल्याचं बोललं जात आहे. तर, विजय राज आणि विनय पाठक यांचीही काही अशंत: भूमिका पाहायला मिळेल.
हेही वाचा -लुडो : अनुराग बसूच्या नव्या चित्रपटाचे शीकर्षक ठरले