ETV Bharat / sitara

अक्षय, आर. बाल्कीच्या 'अ‍ॅड' शूटमुळे फिल्म इंडस्ट्रीत गैरसमज, अशोक पंडित यांनी केला खुलासा

फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या सर्व प्रकारची शूटिंग बंद आहेत. पुन्हा शूटिंग कधी सुरू होतील याची प्रतीक्षा कलाकारांसह तंत्रज्ञ करीत आहेत. मात्र अक्षय कुमार आणि आर. बाल्की सध्या एका जाहिरातीचे शूटिंग करताना दिसले. यानंतर मनोरंजन जगतात अनेक गैरसमज तयार झाले आहेत. यावर अशोक पंडित यांनी व्हिडिओ शेअर करुन खुलासा केला आहे.

Akshay, R. Balki's ad shoot
अक्षय, आर. बाल्कीच्या अ‍ॅड शूट
author img

By

Published : May 26, 2020, 2:43 PM IST

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माते आर. बाल्की सध्या शूटिंग करीत आहेत. या बातमीमुळे सिनेजगतात चर्चेला उधाण आले आहे. नंतर कळले की हे शूटिंग कुठल्यातरी जाहिरातीसाठी आहे. त्यामुळे कोरोना व्हायरससंबंधी सरकारची ही जाहिरात असावी, असाही समज लोकांनी करुन घेतला. अखेर एफडब्ल्यूईसीचे अध्यक्ष असलेले अशोक पंडित यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे.

अक्षय आणि बाल्की यांनी कमलिस्तान स्टुडिओत जाहिरात शूट केली. शूटमधील फोटो मीडियावर प्रसिध्द झाल्यानंतर अशोक पंडित यांचा फोन सतत वाजत राहिला. शूटिंगला शासनाने परवानगी दिली आहे का? हे विचारण्यासाठी हे फोन होते. यानंतर पंडित यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ निवेदन केले आहे. यात त्यांनी याचा खुलासा केलाय.

  • Which is based on drinking water & Sanitation. We are clarifying this because we received lots of calls from the Industry & media for clarifications . A proper police permission has been obtained and submitted at the Federation & the shooting was held with all precautions. pic.twitter.com/Ss2Ca9Yqfi

    — Ashoke Pandit (@ashokepandit) May 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शूटिंगला सुरुवात झालेली नसून अक्षय आणि बाल्की आरोग्याशी संबंधित एक शॉर्ट फिल्म शूट करीत आहेत. शूटिंग सुरू होण्यासाठी अवधी असल्याचे त्यांनी या व्हिडिओत स्पष्ट केले आहे.

“जेव्हा चित्रपटाचे शूट पुन्हा सुरू होईल तेव्हा फिल्म असोसिएशनने याची घोषणा करेल आणि हे पद्धतशीरपणे होईल. सध्या सुरू असलेले शूटिंग हे योग्य मार्गदर्शक सूचना आणि सावधगिरी बाळगून करण्यात आले होते,” असे त्यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.