ETV Bharat / sitara

'हाऊसफुल ४'च्या टीमची रेल्वेमध्ये धमाल, अक्षयने मानले रेल्वे प्रशासनाचे आभार - Housefull 4 team in Housefull 4 Express

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर करण्याची नवी पध्दत यामुळे सुरू झाली आहे. अक्षय कुमारने 'हाऊसफुल ४'च्या टीमसोबत तसेच प्रवाशांसोबत या एक्सप्रेसमध्ये धमाल केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

'हाऊसफुल ४'च्या टीमची रेल्वेमध्ये धमाल, अक्षयने व्हिडिओ शेअर करुन रेल्वे प्रशासनाचे मानले आभार
author img

By

Published : Oct 20, 2019, 4:52 PM IST

मुंबई - देशात पहिल्यांदाच भारतीय रेल्वेने एक नवा आकर्षक बदल केला आहे. 'प्रमोशन ऑन व्हील्स' या संकल्पनेला सुरुवात झाली असून या अंतर्गत आगामी 'हाऊसफुल ४' या चित्रपटाची टीम मुंबईहून दिल्लीला रवाना झाली होती. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर करण्याची नवी पध्दत यामुळे सुरू झाली आहे. अक्षय कुमारने 'हाऊसफुल ४'च्या टीमसोबत तसेच प्रवाशांसोबत या एक्सप्रेसमध्ये धमाल केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

रेल्वेचे देशभर नेटवर्क आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी याचा उत्तम वापर होऊ शकतो. 'मुंबई ते दिल्ली' या दरम्यान वेगवेगळ्या स्टेशन्सवर "हाऊसफुल ४" चे कलाकार चाहत्यांना भेटले. त्यांच्याशी संवाद साधला. तसंच या चित्रपटाचं प्रमोशनही केलं आहे. त्यामुळे अक्षयने व्हिडिओ शेअर करुन रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.

हेही वाचा -'पहला वोट पहला प्यार', धमाल रॅपच्या माध्यमातून मुंबईच्या रॅपर्सचं मतदानासाठी आवाहन

अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, कृति खरबंदा, कृति सेनन आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असेलेल्या "हाऊसफुल ४" चित्रपटात भरपूर मनोरंजन पाहायला मिळेल. ‘हाऊसफुल ४’ हा ‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला चौथा चित्रपट आहे.

फरहाद समजी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, साजिद नादियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २६ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राणा दुगबत्ती, चंकी पांडे, सौरभ शुक्ला, जॉनी लिवर आणि इतरही कलाकार यामध्ये झळकणार आहेत.

हेही वाचा -गांधी @150 : बॉलिवूड कलाकारांनी सांगितले महात्मा गांधीचे विचार, पंतप्रधान मोदींची घेतली भेट

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.