ETV Bharat / sitara

‘टकाटक’च्या अभूतपूर्व ‘१ नंबर’ यशानंतर मिलिंद कवडे घेऊन येताहेत ‘एक नंबर’!

author img

By

Published : Aug 31, 2021, 3:02 PM IST

मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘टकाटक’ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी व्यवसाय करत २०१९ च्या पूर्वार्धाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीत नवचैतन्य निर्माण केलं होतं. ‘टकाटक’च्या माध्यमातून रसिकांचं यशस्वी मनोरंजन केल्यानंतर मिलिंद कवडे अजून एक नवीन चित्रपट घेऊन येतोय. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शन असलेल्या ‘एक नंबर’ या आगामी मराठी चित्रपटाचं लक्षवेधी मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.

मिलिंद कवडे घेऊन येताहेत ‘एक नंबर’!
मिलिंद कवडे घेऊन येताहेत ‘एक नंबर’!

कोरोना महामारीने चित्रपटसृष्टीला आलेली मरगळ आता निर्माते झटकून टाकताना दिसताहेत. गेली दिड-दोन वर्षे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत होते. कोरोनाच्या आघातानंतर आता मराठी चित्रपट चित्रपटगृहे उघडण्याची वाट बघत आहेत आणि अनेक निर्माते, दिग्दर्शक अजूनही नवीन प्रोजेक्ट्सच्या तयारीला लागले आहेत, ज्यात दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचेदेखील नाव आहे. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘टकाटक’ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी व्यवसाय करत २०१९ च्या पूर्वार्धाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीत नवचैतन्य निर्माण केलं होतं. ‘टकाटक’च्या माध्यमातून रसिकांचं यशस्वी मनोरंजन केल्यानंतर मिलिंद कवडे अजून एक नवीन चित्रपट घेऊन येतोय.

तो नेमका कोणत्या प्रकारचा नविन चित्रपट घेऊन येणार याबाबत कुतुहल निर्माण झालं होतं, यासाठी साहजिकच ‘टकाटक’ चं यश हे कारण असू शकेल. लॉकडाऊनच्या काळात मिलिंद एका नव्या चित्रपटाच्या कामात बिझी होता. हा चित्रपट नेमका कोणता आहे या रहस्यावरून आता पडदा उठला आहे. त्याच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे ‘एक नंबर’. करियरमधील पहिल्या चित्रपटापासून रसिकांची आवड ओळखून आपल्या मनातील विषय यशस्वीपणे सादर करणारा मिलिंद पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शन असलेल्या ‘एक नंबर’ या आगामी मराठी चित्रपटाचं लक्षवेधी मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.

‘येडयांची जत्रा’ पासून मिलिंद यांनी सुरू केलेला दिग्दर्शनातील प्रवास ‘टकाटक’सारख्या हिट चित्रपटासोबत ‘एक नंबर’ या सिनेमापर्यंत येऊन पोहोचला आहे. यावेळी मिलिंद मिस्ट्री कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार असल्याची झलक रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळते. ‘एक नंबर’ या चित्रपटाबाबत मिलिंद म्हणाला की, चित्रपटाच्या कथेला पूरक शीर्षक ठेवणं हे त्यातील विषयाला न्याय देण्यासाठी गरजेचं असतं. या चित्रपटाचं ‘एक नंबर’ हे शीर्षकही कथानकाला साजेसं असल्यानंच ठेवण्यात आल्याचं रसिकांना चित्रपट पाहिल्यावर जाणवेल. या माध्यमातून मिस्ट्री कॉमेडी हा जॉनर हाताळला असून, प्रेक्षक त्याला नक्कीच दाद देतील अशी आशाही मिलिंद कवडे ने व्यक्त केली आहे.

‘टकाटक’च्या यशानंतर मिलिंद यांच्या ‘एक नंबर’ या चित्रपटातही प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रथमेशच्या जोडीला मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा धावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली असून संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. हजरत शेख (वली) या चित्रपटाचे डीओपी आहेत. पटकथा सहाय्यक म्हणून संजय नवगिरे आणि सुनिल मगरे यांनी काम पाहिले आहे. संकलन प्रणव पटेल यांनी केलं असून पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे. जय अत्रेनं लिहिलेल्या गीतरचना संगीतकार वरूण लिखते यांनी संगीतबद्ध केल्या आहेत.

धुमाळ प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत तसेच आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने तयार होत असलेल्या ‘एक नंबर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाद्वारे धुमाळ प्रोडक्शन सिनेनिर्मितीकडं वळलं आहे.

लक्षवेधी शीर्षकं असलेले चित्रपट बनवण्यात आघाडीवर असलेल्या मिलिंद कवडे याच्या ‘एक नंबर’ या चित्रपटाचं टायटलही खरोखर ‘१ नंबर’ आहे.

हेही वाचा - सोनम कपूर पती आनंदच्या आठवणीने झाली व्याकूळ, विरहात शेअर केला फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.