मुंबई - अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाचं अॅडव्हांस बुकिंगही सुरू झालं आहे. २७ सप्टेंबर पासून या चित्रपटाचं तिकिट बुक करता येणार आहे.
मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्ससाठी अॅडव्हांस तिकिट बुकिंग सुरू झाली आहे.
-
#YRF to begin advance bookings of #War from Friday [27 Sept 2019] across multiplexes and single screens... 2 Oct 2019 release in #Hindi, #Tamil and #Telugu. #HrithikVsTiger pic.twitter.com/m08KGG6i5d
— taran adarsh (@taran_adarsh) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#YRF to begin advance bookings of #War from Friday [27 Sept 2019] across multiplexes and single screens... 2 Oct 2019 release in #Hindi, #Tamil and #Telugu. #HrithikVsTiger pic.twitter.com/m08KGG6i5d
— taran adarsh (@taran_adarsh) September 25, 2019#YRF to begin advance bookings of #War from Friday [27 Sept 2019] across multiplexes and single screens... 2 Oct 2019 release in #Hindi, #Tamil and #Telugu. #HrithikVsTiger pic.twitter.com/m08KGG6i5d
— taran adarsh (@taran_adarsh) September 25, 2019
बॉलिवूडचे दोन अॅक्शन हिरो एकत्र येणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. दोघांचा धमाल डान्स असलेलं 'जय जय शिवशंकर' हे गाणं देखील सोशल मीडियावर हिट झालं आहे. अभिनेत्री वाणी कपूर देखील यामध्ये भूमिका साकारणार आहे. त्यामुळेच 'यशराज फिल्म्स'ने पाच दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या अॅडव्हांस बुकिंग सुरू केलं आहे.
हेही वाचा - मुंबई पोलिसांनी खास अंदाजात केलं अमिताभ बच्चन यांचं अभिनंदन, पाहा ट्विट
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -'त्या' मंजुळ आवाजाची प्रेक्षकांवर भूरळ,'ड्रीम गर्ल'चं बॉक्स ऑफिसवर शतक