मुंबई - दिग्गज अभिनेता परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल झी ५ च्या 'बम्फाड' या फिल्ममधून सिनेक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय. स्टार किड म्हणून असलेल्या अतिरिक्त दबावासाठीही त्याने तयारी केली आहे. वडिलांसोबत होणाऱ्या तुलनेची काळजी वाटत नसल्याचे त्याने म्हटलंय. कारण वडिल खूप पुढे असल्याचे त्याला वाटते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
आदित्य हा झी ५ च्या 'बम्फाड' या ओरिजनल फल्ममधून सिनेक्षेत्रात पदार्पण करीत आहे. स्टार किड म्हणून असलेल्या दबावाबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, "व्यवसायात सफल लोकांची मुले म्हणून भरपूर फायदेही मिळतात. अशात आम्ही ट्रेडबद्दल जाणतो. असे जर फायदे मिळत असतील तर अतिरिक्त दबावासाठी सज्ज असले पाहिजे."
तो पुढे म्हणाला, "फायदे खूप आहेत आणि त्याची एक बाजू आहे. माझे वडिल एक उत्तम अभिनेता आहेत लोक माझी तुलना त्यांच्याशी करतील याचे भीती नाही. कारण मला माहिती आहे की, मी त्याच्या आसपासही जाऊ शकत नाही."
आदित्य पुढे म्हणाला, "माझ्या वडिलांचा स्तर खूप वरचा आहे. म्हणून माझी तुलना त्यांच्याशी झाली तर त्याची भीती वाटत नाही. व्यक्तीगत पातळीवर मी खूप स्वतंत्र आहे. त्यामुळे मी तेच करीत आहे जे मला शक्य आहे."