गणपती बाप्पाच्या आगमनावेळी अनेक बाप्पाची नवनवीन गाणी येत असतात. त्यातीलच एक म्हणजे पीबीए म्युझिकचे ‘हे गणराया’ हे गाणे जे गायलंय आदर्श शिंदे याने. देशावर अद्यापही कोरोना विषाणूचे सावट आहेच. त्यामुळे प्रत्येक सण, उत्सव साध्या पद्धतीनेच साजरे करावे लागत आहेत. असे असले तरी या काळातही गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर तितकाच आनंद झळकत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी सार्वजनिक मंडळांमध्ये किंवा घरांमध्ये गणेशोत्सवाची ठराविक गाणी लावली जातात. विशेष म्हणजे यातली काही गाणी अशी आहेत ज्यांची नवलाई तसूभरही कमी झालेली नाही.
'हे गणराया' असे शब्द रचत गायक आदर्श शिंदे आणि गायिका श्रावणी महाजन यांनी हे गाणे सुमधुर आवाजात गायले आहे. तर या गाण्याचे बोल गीतकार संग्राम पाटील आणि मयुरेश शिंदे लिखित असून या गाण्याच्या संगीताची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी ही मयुरेशने उत्तमरीत्या पेलवली आहे. तर क्रिएटिव्ह हेड म्हणून वैभव लोंढे यांनी गाण्याची सूत्रे सांभाळली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा - मोहित रैनाने आपल्या डॉक्टर वडिलांसोबत सर्व फ्रंटलाइन वर्कर्सना केला सलाम!
हेही वाचा - कंगनाच्या 'थलायवी'ला थंड प्रतिसाद, पहिल्या दिवशीची कमाई 'बेलबॉटम'पेक्षा कमी