मुंबई - प्रत्येक फिल्म मेकर नेहमीच इतरांपेक्षा काहीतरी वेगळं देण्याच्या प्रयत्नात असतो. दिग्दर्शक प्रसाद कदम त्याच्या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांना कधीही न अनुभवलेल्या चित्रपट-प्रवासाला घेऊन जाणार आहे. ‘चुहा बिल्ली’ असे नाव असलेला हा चित्रपट मनुष्याच्या मनोविकृतीवर भाष्य करताना दिसेल. यात अभिनेत्री अदा शर्मा मानसिक आजार पीडित ‘मेंटल’ व्यक्तिरेखा साकारणार आहे.
दिग्दर्शक प्रसाद कदम म्हणाला, "मानसिक आरोग्य हा एक अतिशय गंभीर आणि गुंतागुंतीचा विषय आहे. एक संवेदनशील चित्रपट बनवावा हे मी निश्चित केले होते. मानसिक विकारांचे अजिबात उदात्तीकरण न करता या आजाराने पीडित व्यक्तींना अवाजवी सहानुभूती न देता या कथेची मांडणी केली आहे. अदा आणि अनुप्रिया या दोन्ही अभिनेत्रींनीं उत्कृष्ट काम केले आहे. त्यांची पात्रे अत्यंत वास्तविक वाटतात.”
‘एफएनपी मीडिया’ चे अहमद फराज म्हणाले, “‘चुहा बिल्ली’ हा चित्रपट आमच्यासाठी स्पेशल आहे. आम्हाला जशा आशयघन चित्रपटांची निर्मिती करायची आहे त्यातील पहिला हा चित्रपट आहे. अदा आणि अनुप्रिया या दोघीही प्रतिभावान अभिनेत्री आहेत. त्यांच्यासोबत पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल. आम्ही ज्या तळमळीने चित्रपट बनवलाय तेवढ्याच तन्मयतेने त्याला पाठिंबा मिळेल ही अपेक्षा आहे.’
‘चूहा बिल्ली’ ची अशी कहाणी आहे जी मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त असलेल्या अदाची व्यक्तिरेखा कतरीना भोवती फिरते. मानसिक आरोग्याच्या विषयावर बोलायचं झालं तर या मानसिक आजाराचा सामना करू शकतात पण काही करू शकत नाहीत. कतरिनाचे पात्र एकाधिक स्तरित आणि गुंतागुंतीचे आहे आणि ही अदाची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी असावी. अदा शर्मा सोबतच अनुप्रिया गोयंका देखील महत्वपूर्ण भूमिकेत असणार आहे. अनुप्रिया वॉर, पद्मावत, क्रिमिनल जस्टीस आणि टायगर जिंदा है अशा चित्रपटांतील भूमिकांसाठी परिचित आहे.
‘एफएनपी मीडिया’ ची निर्मिती असलेला चित्रपट ‘चुहा बिल्ली’चे दिग्दर्शन प्रसाद कदम यांनी केले असून तो येत्या १२ फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे.
हेही वाचा - मनी लाँडरिंग प्रकरणी राज कपूर यांचा नातू अरमान जैनला ईडीकडून समन्स