ETV Bharat / sitara

अभिनेता प्रकाश राजच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया, सुखरुप असल्याचा चाहत्यांना संदेश

ख्यातनाम दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांना अपघात झाल्यानंतर हैदराबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वतः प्रकाश राज यांनी आता एक फोटोसह पोस्ट शेअर करुन सुखरुप असल्याचे चाहत्यांना कळवले आहे. त्यानी पोस्ट केलेल्या फोटोत डाव्या खांद्यावर शस्त्रक्रियेनंतर पट्टी बांधलेली दिसते.

प्रकाश राजच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया

author img

By

Published : Aug 12, 2021, 7:03 PM IST

हैदराबाद - दक्षिण चित्रपट उद्योगाचे प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज अलिकडेच अपघात ग्रस्त झाले होते. त्यानंतर हैदराबादला ते शस्त्रक्रियेसाठी पोहोचले होते. ही माहिती त्यांनी ट्विट करुन चाहत्यांना कळवली होती. आता त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून सुखरुप असल्याचे कळवले आहे. त्यानी पोस्ट केलेल्या फोटोत डाव्या खांद्यावर शस्त्रक्रियेनंतर पट्टी बांधलेली दिसते.

प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''डेविल इज बॅक, शस्त्रक्रिया यशस्वी झाली ...प्रिय मित्र डॉक्टर गुरुवर रेड्डी यांचे आभार. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार...लवकरच कामावर परतेन."

प्रकाश राज यांनी 10 ऑगस्ट रोजी एका ट्विटमध्ये अपघाताची माहिती दिली होती आणि सांगितले होते की अपघातात लहान फ्रॅक्चर झाले आहे आणि त्यांचे मित्र डॉ गुरुवर रेड्डी यांच्याकडे शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला घेऊन जात आहेत.

'एक लहानसा अपघात...एक लहानसे फ्रॅक्चर... डॉ. गुरु रेड्डी यांच्या हातून सुरक्षित हाताने शस्त्रक्रिया व्हावी यासाठी हैदराबादला उड्डाण करीत आहे. मी बरा आहे काळजी नसावी...', अशा आशयाचे ट्विट प्रकाश राज यांनी केले होते.

प्रकाश राज हे अभिनयासोबतच सामाजिक विषयावर भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ते आपले विचार आक्रमकपणे मांडत आले आहेत. 2019 मध्ये त्यांने बंगळूरू शहरातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता.प्रकाश राज हे कर्नाटकातील अनेक गावामध्ये पर्यावरण रक्षणासोबतच कष्टकरी जनतेसाठी सबळीकरणाचे काम करतात. यासाठी आपल्या कमाईचा मोठा भाग ते खर्च करीत असतात.

प्रकाश राज यांनी दक्षिण हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमधून आपले नाव कमावले आहे. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्यामुळे आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

प्रकाश राज यांनी 'वॉन्टेड', 'सिंघम' आणि 'पोलीसगिरी' सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच वेळी, दक्षिण चित्रपट उद्योगात, ते सुपरस्टार महेश बाबूच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पोकीरी' मध्ये मुख्य खलनायक म्हणून कामगिरी केली होती.

सध्या अभिनेता प्रकाश राज मूवी आर्टिस्ट्स एसोसिएशनच्या(एमएमए) अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. हैदराबादमध्ये MAA च्या निवडणुका होणार आहेत.

हेही वाचा - ‘ती परत आलीये’ मधील ‘ती’ आली सर्वांसमोर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.