नाशिक - मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिन्मय उद्गीरकर याने नाशिक येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच, मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहनही त्याने केले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने चिन्मयची ब्रँड अॅम्बेसडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी आणि भविष्यातील विकासासाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन चिन्मय ने केलं. यावेळी त्याने ई टीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.
हेही वाचा -शूटिंग आणि नाटक बाजूला ठेवत मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
मतदान केंद्र -
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.
हेही वाचा -किरण राव, लारा दत्ताने बजावला मतदानाचा हक्क