ETV Bharat / sitara

मानवी भावना कॅमेऱ्यात कैद करण्यात अभिषेक कपूर मास्टर - वाणी कपूर - आयुष्मान खुरानासोबत वाणी कपूर

दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या आगामी प्रेमकथेवर आधारित चित्रपटात वाणी कपूर काम करणार आहे. यासाठी ती आतुर झाली. आयुष्मान खुरानासोबत तिच्या या चित्रपटात जोडी असणार आहे.

Vaani Kapoor
वाणी कपूर
author img

By

Published : Oct 16, 2020, 5:23 PM IST

मुंबई - आयुष्मान खुरानासोबत प्रेमकथेवर आधारित चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे अभिनेत्री वाणी कपूर आनंदित आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यासोबत हा चित्रपट ती करीत आहे. अभिषेकसारख्या दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करण्यास आतुर असल्याबाबतचा अनुभव तिने शेअर केलाय.

वाणी म्हणाली, ''मानवी भावना कॅमेऱ्यात कैद करण्याचा जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा यात अभषेक कपूर मास्टर आहेत. त्यांनी रॉक ऑन, काइ पो छे आणि केदारनाथ सारखे अप्रतिम कलाकृती केल्या आहेत. नात्यातील बारकावे ओळखण्याच्या, समजण्याच्या त्यांच्या हातोटीने मला भुरळ पडली आहे.''

वाणी म्हणाली की अभिषेकने 'काइ पो छे' मधील तीन मित्रांची कथा ज्या पद्धतीने रेखाटली आहे, त्यामुळे तिला त्यांचे आश्चर्य वाटले.

ती म्हणाली, "ते वास्तविक होते, ते सोपे पण गुंतागुंतीचे होते आणि ते हृदयद्रावकही होते, पण सुंदर होते. मी त्याच्याबरोबर काम करण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा करू शकत नाही. कारण मला वाटते की, या प्रेमकथेच्या सेटवर मी बरेच काही शिकू शकते. "

ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत गेल्या वर्षी 'वॉर'मध्ये वाणी कपूरने काम केले होते. त्याबद्दल ती म्हणाली, "मेगास्टार्ससह हा एक खूप मोठा चित्रपट होता. हृतिक आणि टायगर पहिल्यांदाच स्क्रीनवर एकत्र आले होते आणि मीही एका मोठ्या गाण्याचा एक भाग होते."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.