मुंबई - अभिनेता आदित्य रॉय कपूरचा आज ३५ वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने झी स्टुडिओ आणि निर्माते अहमद खान यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. आदित्यची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे शीर्षक असेल 'ओम - द बॅटल विदीन.' त्याच्या वाढदिवसाला निर्मात्यांकडून मिळालेली ही मोठी सरप्राईज भेट मानली जात आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
झी स्टुडिओच्या सोशल मीडिया हँडलवर आदित्य रॉय कपूरचा शर्टलेस फोटो शेअर करण्यात आला असून यामध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा -पारंपरिक ऑफ व्हाईट ड्रेसमध्ये अनुष्काने दाखवला 'प्रेग्नेंसी ग्लो'
अहमद, शायरा आणि झी स्टुडिओ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मा करणार आहेत. हा चित्रपट डिसेंबरमध्ये फ्लोअरवर शूटिंगसाठी जाणार आहे, तर 2021 च्या उत्तरार्धात सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात येईल.